Maratha Reservation : "चंद्रकांत पाटलांची मराठा आरक्षण उपसमितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा"

चंद्रकांत पाटलांकडून मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप
Maratha Reservation
Maratha ReservationEsakal
Updated on

मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीत गोंधळ झाल्याचं दिसुन आलं. मराठा क्रांती ठोक मोर्चातील काही लोक नाराज असल्यामुळे त्यांनी बैठकीत गोंधळ घालाायचा प्रयत्न केला. यावेळी भाजपा नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विरोधात नारेबाजी देखील करण्यात आली. तर चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे.

चंद्रकांत पाटील हे केवळ समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी करा अशी मागणी यावेळी सर्व समन्वयकांनी केली. त्यामुळं गोंधळ निर्माण झाला आहे.

Maratha Reservation
Ajit Pawar: शिंदे गटात गोंधळ! शिरसाटांचे बाहेर पडण्याचे संकेत तर सत्तार म्हणतात 'शिंदेच मुख्यमंत्री...'

मंगळवारी (18 एप्रिल) मराठा आरक्षण उपसमितीची बैठक सह्याद्री अतिथीगृह येथे पार पडली. या बैठकीला अध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. बैठकीमध्ये मराठा समाजाच्या समन्वयकांनी चंद्रकांत पाटील यांना अनेक प्रश्न केले. मात्र, पाटील यांना त्याची उत्तरे देता आली नाहीत.

Maratha Reservation
Ajit Pawar: अजित पवार म्हणतात पक्ष सोडणार नाही पण सोशल मिडिया प्रोफाइलवर तर...

दरम्यान मराठा क्रांती मोर्चा महाराष्ट्र राज्य समन्वयक अंकुश कदम म्हणाले. चंद्रकांत पाटील मराठा समाजामध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केली. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांची मराठा आरक्षण उप समितीच्या अध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात आली आहे. त्यामुळेच समितीच्या बैठकीमध्ये गोंधळाचा वातावरण दिसुन आलं आहे.

Maratha Reservation
Ajit Pawar: महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Maratha Reservation Row: Government Pushes Back in Court, Backs Shukre Panel Findings
Manoj Jarange latest news Maratha OBC Benefits
Promise Delivered: Families of Deceased Agitators to Get Employment in MIDC Units
Big Relief for Maratha Youth as State Approves Additional ₹150 Crore Fund
Marathi News Esakal
www.esakal.com