मंत्रालयातील धार्मिक छायाचित्रे काढाः सरकार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 जानेवारी 2017

मुंबई: मंत्रालयातील विविध कार्यालयांमध्ये लावण्यात आलेले धार्मिक छायाचित्रे काढण्यात यावीत, असे परिपत्रक राज्य सरकारने काढले आहे.

सन 2002 मध्ये आघाडी सरकारने यासंदर्भात प्रथम परिपत्रक काढले होते. परंतु, हा आदेश राबवण्याबाबत सरकारने त्यावेळी आग्रही भूमिका घेतली नव्हती. जे आघाडी सरकारला जमले नाही, ते हिंदुत्ववादी सरकारने करुन दाखवल्याने शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे.

दरम्यान, शिवसेना निवडणुकांमध्ये हिंदुत्ववादाचा मुद्दा उपस्थित करण्याची शक्यता आहे. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे प्रजासत्ताक दिनी करणाऱ्या भाषणात या मुद्द्यावरुन भाजप सरकारवर टीका करण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश निवडणुकीत भाजप राम मंदिराचा मुद्दा काढणार असल्यामुळे त्याला शिवसेना प्रत्युत्तर देण्याचे संकेत आहेत. महाराष्ट्रातील हिंदुत्ववादी सरकारनेच मंत्रालयातील धार्मिक छायाचित्रांनाना हद्दपार करत जनतेच्या भावनेला हात घातल्याचा आरोप होत आहे.

Web Title: Remove religious photographs: government