"कमळा'वर लढणारे रिपब्लिकनचे उमेदवार निलंबित 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 9 फेब्रुवारी 2017

मुंबई - रिपब्लिकन पक्षाने (आठवले गट) मुंबईत भाजपशी युती कायम ठेवली असली तरी अन्य महापालिकांमध्ये रिपब्लिकन पक्ष स्वबळावर लढत असल्याचे बुधवारी जाहीर केले आहे. अन्य महापालिकांमध्ये युतीच्या प्रस्तावावर निर्णय न घेताच भाजपने पक्षाच्या उमेदवारांना परस्पर कमळ चिन्ह दिले आहे. यामुळे कमळ चिन्हावर निवडणूक 
लढवणाऱ्या पुणे, सोलापूर येथील रिपब्लिकन उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. 

महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांमध्ये युती करण्याचे रिपब्लिकन पक्षातर्फे (आठवले गट) जाहीर करण्यात आले होते. पण मित्र पक्ष भाजपच्या कमळ या निवडणूक चिन्हावर उमेदवारांनी निवडणूक लढवू नये, तसे केल्यास पक्षातून निलंबित करण्यात येईल, असा ठराव लोणावळ्यातील राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत सर्वसंमतीने करण्यात आला. त्यानुसार कमळ चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या पुणे, सोलापूर येथील "आरपीआय'च्या उमेदवारांना पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. "आरपीआय'चे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांच्या आदेशानुसार पक्षाची पुणे शहर जिल्हा कार्यकारिणी बर्खास्त करण्यात आली असल्याची अधिकृत घोषणा राज्य सरचिटणीस राजा सरवदे यांनी केली आहे.

Web Title: Republican candidate suspended