

FSSAI on Bisleri
ESakal
मुंबई : भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाने (एफएसएसएआय) दिलेल्या स्पष्टीकरणाचे बिसलेरीने स्वागत केले आहे. गोव्यातील प्रकल्पात तयार झालेल्या पाण्याच्या एका नमुन्याबाबत स्पष्टीकरण मागविण्यात आले होते. ही बाब १४ महिन्यांपूर्वी तयार केलेल्या एका विशिष्ट बॅचशी संबंधित असून, कंपनीच्या देशभरातील अन्य उत्पादनांशी तिचा संबंध नसल्याचे बिसलेरीने स्पष्ट केले आहे.