दहावीचा निकाल उद्या होणार जाहीर! 'इथे' पहा तुमचा निकाल

मिनाक्षी गुरव
Tuesday, 28 July 2020

निकाल येथे पाहता येईल :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

"www.mahresult.nic.in" या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

पुणे : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेच्या निकाल बुधवारी (ता. २९) जाहीर होणार आहे. निकाल दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली आहे. त्यामुळे जून महिन्यापासून सूरू असलेली दहावीच्या निकालाची प्रतीक्षा मंगळवारी अखेरीस संपली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरवर्षी जुनाच्या पहिल्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर केला जातो. मात्र यंदा कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्याने उत्तरपत्रिका तपासणी आणि त्याच्याशी संबंधित कामे लांबली. त्यामुळे निकाल जुलैच्या अखेरीस जाहीर होईल, असे शिक्षण विभागाने यापूर्वी सांगितले होते. त्याप्रमाणे हा निकाल जाहीर होत आहे.
राज्य मंडळाच्या वतीने मार्च २०२० मध्ये पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर, कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची परीक्षा घेण्यात आली होती. मात्र कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यानंतर दहावीच्या परीक्षेतील भूगोलाचा पेपर पुढे ढकलण्यात आला. मात्र पुन्हा लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आल्याने यंदा दहावीचा भूगोलाचा पेपर रद्द करून सरासरी गुण देण्याचा निर्णय घेण्यात आला.

एक दिवसाच्या आंदोलनामुळे महाराष्ट्र सरकारचे 100 कोटींचे नुकसान

निकाल येथे पाहता येईल :
www.mahresult.nic.in
www.sscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com
....
"www.mahresult.nic.in" या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालाबरोबरच वेगवेगळी सांख्यिकी माहिती उपलब्ध होईल.

राज्यातील साठ गावांमध्ये मिळणार 'ई प्रॉपर्टी कार्ड' ऑनलाइन

निकालाचा तपशील पुढीलप्रमाणे :
- ऑनलाईन निकालानंतर लगेचच दुसऱ्या दिवसांपासून अनिवार्य विषयांपैकी कोणत्याही विषयात संपादित केलेल्या गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकन आणि स्थलांतर प्रमाणपत्रासाठी विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या "http://verification.mh-ssc.ac.in" संकेतस्थळावरुन स्वतः किंवा शाळा? कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून दिली आहे.
- गुणपडताळणीसाठी ३०जुलै ते ८ऑगस्टपर्यंत, तर छायाप्रतीसाठी ३०जुलै ते १८ ऑगस्ट पर्यंत अर्ज करता येणार (ऑनलाईन पद्धतीने शुल्क भरता येईल)
- उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत अनिवार्य असून ही प्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत विहित शुल्क भरून विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज करता येईल.
- दहावीच्या परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी श्रेणी/ गुणसुधार योजने
अंतर्गत उपलब्ध असतील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The results of the 10th will be announced on Wednesday