परिणाम सिद्ध करणारी गुंतवणूक हवी

इस्तबान गोमेझ नदाल,जागतिक संचालक,पॅलेडियम, जर्मनी
गुरुवार, 26 जानेवारी 2017

जागतिक स्तरावरील सुधारणांच्या प्रक्रियेत सामाजिक व आर्थिक बदल केवळ सकारात्मक परिणाम करणारे असतील तरच शाश्वत व चिरंतन विकास साधला जाऊ शकतो. हेच ब्रीद घेऊन 'पॅलेडियम' ही संस्था जगातील १२० देशांमध्ये सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. राजस्थानमध्ये या संस्थेने आरोग्याच्या क्षेत्रात अशाप्रकारचा सकारात्मक परिणाम करून दाखवल्याने सामान्य नागरिकांसाठी कायमस्वरूपी कार्यरत यंत्रणा उभारण्यात यश आले आहे.

जागतिक स्तरावरील सुधारणांच्या प्रक्रियेत सामाजिक व आर्थिक बदल केवळ सकारात्मक परिणाम करणारे असतील तरच शाश्वत व चिरंतन विकास साधला जाऊ शकतो. हेच ब्रीद घेऊन 'पॅलेडियम' ही संस्था जगातील १२० देशांमध्ये सकारात्मक परिणाम घडवण्यासाठी पंधरा वर्षांपासून कार्यरत आहे. राजस्थानमध्ये या संस्थेने आरोग्याच्या क्षेत्रात अशाप्रकारचा सकारात्मक परिणाम करून दाखवल्याने सामान्य नागरिकांसाठी कायमस्वरूपी कार्यरत यंत्रणा उभारण्यात यश आले आहे.
महाराष्ट्रातही सकाळ माध्यम समूहाच्या व डिलिव्हरिंग चेंज फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध क्षेत्रांत पॅलेडियम संस्था कार्य करण्यास सज्ज आहे. 'मानवी चेहरा' असलेला अामूलाग्र बदल सकाळ माध्यम समूहाने हाती घेतलेल्या उपक्रमातून होऊ शकतो, यावर आमचा विश्वास अाहे.

पॅलेडियम ही संसाधनाभिमुख संस्था आहे. जगभरातील विविध संस्था, उद्योगसमूह, सरकार व लोकसहभाग यांच्यात सकारात्मक सहकार्याने सामाजिक व आर्थिक बदल करणे सहज शक्य आहे. त्यावर पॅलेडियम संस्थेचा विश्वास आहे. सामाजिक व आर्थिक बदल घडवताना कोणतीही गुंतवणूक परिणाम सिद्ध करणारी असायला हवी. त्यातून क्षमतानिर्मिती व आर्थिक विकास साधणारी यंत्रणा संस्थापित व्हावी, या हेतूने काम करायला आम्ही कटिबद्ध आहोत. जग बदलणार यावर आमचा विश्वास असून, हा बदल घडताना सामाजिक व आर्थिक मूल्य परस्परांवरच आधारित राहतील या दिशेने काम व्हायला हवे. परस्परांच्या उत्तम सहकार्यासोबतच जगातील विविध संस्थांचे ज्ञान व कार्यप्रणाली एकत्र जोडून कार्य केल्यास सकारात्मक बदलांचे परिणाम तत्काळ दिसू लागतील. यामुळे सामान्य जनतेचा होणाऱ्या बदलावर विश्वासही बसेल, त्यातून जनतेचा सहभाग मोठ्या प्रमाणात वाढेल. परिणामी आर्थिक विकासासोबतच सामाजिक बदल हा हेतू साध्य होईल.  केवळ पैशाची अर्थव्यवस्था हा बदल नसून सामाजिक उत्क्रांतीच्या दिशेने समाजाची वाटचाल हा खरा आर्थिक व सामाजिक विकास अभिप्रेत आहे.  

सध्या अनेक उद्योग स्वत:च्या सामाजिक निधीतून विविध विकासकामे उभारण्यासाठी पुढे येत आहेत. मात्र, मूलभूत सुविधांच्या अज्ञानामुळे या निधीचा परिणामकारक वापर होताना दिसत नाही. जंगलातील शाळेसाठी दिलेला निधी केवळ शाळा बांधण्यासाठीच दिला अाणि जंगलात जाणारे रस्तेच नसतील तर शिक्षण हा मूलभूत उद्देश बाजूलाच राहील. केवळ शाळा बांधल्याचे समाधान हा सामाजिक विकास ठरणार नाही. त्यामुळे विविध विकास योजनांची प्रभावी व परिणामकारक अंमलबजावणी करताना संस्था, सहकार्य, जागतिक संकल्पनांवर आधारित समन्वयाने उपाय शोधल्यास 'सकारात्मक बदल' हा 'परिणामकारक बदल' घडू शकतो. जगाला सहकार्य व सहयोगाची गरज आहे. त्यातच जगभरातील युवक बदल घडवण्यासाठी आतुर आहेत. या सर्वाना सोबत घेऊन संसाधनावर आधारित कार्य उभे केल्यास सकारात्मक व परिणामकारक बदल अटळ आहे.

Web Title: The results should prove that the investment