शिवसेनेचा बाण सुसाट; तर कमळ कोमजले 

सकाळ न्यूज नेटवर्क
शुक्रवार, 29 जून 2018

मुंबई - विधान परिषदेच्या जागांचे निकाल आज जाहीर झाले. यामध्ये, चारपैकी एक जागा शिवसेनेने जिंकली असून, दुसऱ्या जागेवर आघाडी घेतली आहे. या विजयाने त्यांनी भाजपसह कॉंग्रेस- राष्ट्रवादीला धोबीपछाड दिला. तर, कोकण पदवीधरमध्ये भाजपने गड काबीज करण्याच्या दिशेने आगेकूच सुरू ठेवली. मुंबई शिक्षक मतदारसंघात कपिल पाटील यांचा करिष्मा कायम राहिल्याने कॉंग्रेस- राष्ट्रवादीला पुरस्कृत उमेदवार विजयी झाल्याचे समाधान मानावे लागले. रात्री उशिरापर्यंत मतमोजणी सुरू होती. 

मुंबई पदवीधर व कोकण पदवीधर मतदारसंघात शिवसेना व भाजप यांच्यात कमालीची चुरस होती. दोन्ही सत्ताधारी पक्षांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मुंबई पदवीधर हा शिवसेनेचा गड असला, तरी आतापर्यंत भाजपसोबत युती करून तो राखला जात होता. या वेळी मात्र युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी स्वबळावर उमेदवार देत भाजपसोबत सामना केला. यात विलास पोतनीस यांनी भाजपच्या उमेदवाराचा पराभव केला. मुंबईसारख्या ठिकाणी शहरी व सुशिक्षित मतदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रतिमेला प्रतिसाद देतील असे मानले जात होते. मात्र, मुंबईतल्या पदवीधरांनी भाजपचा अंदाज मोडीत काढत शिवसेनेला पसंती दिली. तर, मुंबई शिक्षक मतदारसंघातही भाजप व शिवसेनेला धक्‍का देत जनता दलाचे कपिल पाटील यांनी बाजी मारली. 

नाशिक शिक्षक मतदारसंघात शिवसेनेच्या किशोर दराडे यांनी शिक्षक आघाडी व कॉंग्रेस- राष्ट्रवादी पुरस्कृत संदीप बेडसे यांच्याविरुद्ध रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या मतमोजणीत निर्णायक आघाडी घेतली होती. ते पहिल्या फेरीत साडेचार हजार मतांनी आघाडीवर होते. 

कोकण पदवीधर मतदारसंघात रात्री उशिरापर्यंत मतमोजणीची तिसरी फेरी सुरू होती. त्यात भाजपचे निरंजन डावखरे यांनी तीन हजार मतांनी आघाडी घेतली होती. 

विजयी उमेदवार 
मुंबई शिक्षक मतदारसंघ - कपिल पाटील (आघाडी पुरस्कृत) 
मुंबई पदवीधर मतदारसंघ - विलास पोतनीस (शिवसेना) 

निर्णायक आघाडी 
कोकण पदवीधर मतदारसंघ - निरंजन डावखरे (भाजप) 
नाशिक शिक्षक मतदारसंघ - किशोर दराडे (शिवसेना) 

Web Title: The results were announced today at the Legislative Council seats