निवृत्त प्राध्यापकाला ८ लाख रुपयाला गंडविले! डिजिटल ॲरेस्टची भीती दाखवून फसवणूक; बॅंकेतील ‘एफडी’ मोडून पाठविली रक्कम, कशी झाली फसवणूक, वाचा...

तुमच्या आधारकार्डचा वापर करून नरेश गोयल या मोठ्या सायबर गुन्हेगाराने सिमकार्ड खरेदी केले आहे. त्यावरून अश्‍लील फोटो व व्हिडिओ काहीजणांना पाठविल्याचे सांगितले. त्यावरून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सुप्रिम कोर्टातून तुमच्या नावाचे अटक वॉरंट जारी झाल्याची भीती घातली.
Cyber Fraud
Cyber FraudSakal
Updated on

तात्या लांडगे

सोलापूर : जुळे सोलापुरातील सेवानिवृत्त प्राध्यापकाला अटकेची भीती दाखवून सायबर गुन्हेगारांनी डिजिटल ॲरेस्ट केले. सतत व्हिडिओ कॉलवर ठेवून तब्बल आठ लाख रुपयांना गंडविल्याची घटना समोर आली आहे. आपली फसवणूक झाल्याची खात्री होताच त्या निवृत्त प्राध्यापकाने मुलाला कॉल करून हकीकत सांगितली. त्यानंतर त्यांनी सायबर पोलिसांत धाव घेतली असून, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.

काही महिन्यांपूर्वी सेवेतून निवृत्त झालेले प्राध्यापक पत्नीसोबत जुळे सोलापुरात राहायला आहेत. त्यांचा मुलगा ठाण्यात नोकरीसाठी आहे. मागील आठवड्यात त्या निवृत्त प्राध्यापकाला अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. त्यांनी तो कॉल उचलला आणि, तुमच्या आधारकार्डचा वापर करून नरेश गोयल या मोठ्या सायबर गुन्हेगाराने सिमकार्ड खरेदी केले आहे. त्यावरून अश्‍लील फोटो व व्हिडिओ काहीजणांना पाठविल्याचे सांगितले. त्यावरून तुमच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून, सुप्रिम कोर्टातून तुमच्या नावाचे अटक वॉरंट जारी झाल्याची भीती घातली.

तुम्हाला कधीही अटक होऊ शकते, सध्या तुम्हाला डिजिटल ॲरेस्ट करण्यात आले असून, याची माहिती कोणालाही सांगू नका, असेही त्या सायबर गुन्हेगारांनी बजावले. आतापर्यंत कमावलेली इज्जत जाईल, या भीतीने त्या निवृत्त प्राध्यापकाने ही बाब कोणालाही सांगितली नाही.

पत्नीला खोटे सांगून मोडली ‘एफडी’

सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकलेले ते निवृत्त प्राध्यापक पत्नीला काहीतरी खोटे सांगून घरातून बाहेर पडले. त्यानंतर त्यांनी निवृत्तीनंतर मिळालेल्या रकमेची राष्ट्रीयीकृत बॅंकेत ठेवलेली एफडी (फिक्स डिपॉझिट) मोडली. त्यानंतर ऑनलाइन जमा झालेले पैसे त्या सायबर गुन्हेगाराला पाठविले. ती संपूर्ण रक्कम गुजरातमधील बॅंक खात्यात जमा झाली असून, त्यात सध्या अवघे पाच हजार रुपयेच शिल्लक आहेत. सायबर गुन्हेगारांनी ती रक्कम लगेचच दुसऱ्या खात्यात वर्ग केल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी दिली.

मुलाला कॉल केला अन्‌ डोक्याला हात लावला

रक्कम पाठविल्यानंतर निवृत्त प्राध्यापकास थोडा संशय आला. त्यांनी लगेच मुलाला कॉल केला. त्यावेळी वडिलास सायबर गुन्हेगारांनी फसविल्याची खात्री झाली. त्यांनी ओळखीच्या पोलिस अधिकाऱ्यास कॉल करून हकीकत सांगितली. त्यांच्या सल्ल्याने १९३० या टोल फ्री क्रमांकावर तक्रार नोंदविली. पण, त्या खात्यातूनही सगळीच रक्कम सायबर गुन्हेगारांनी दुसरीकडे पाठविली होती. त्यानंतर निवृत्त प्राध्यापकाने डोक्यालाच हात लावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com