

Maharashtra Agricultural Land Revenue Rules
esakal
Chandrashekhar Bawankule Statement : मोठ्या प्रमाणात शेतजमिनी खरेदी करून त्या वर्षानुवर्षे पडीक ठेवणाऱ्या व्यापारी आणि व्यावसायिकांना राज्य सरकार चाप लावण्याच्या तयारीत आहे. खरेदी केलेली शेतजमीन तीन वर्षांपेक्षा अधिक काळ पडीक ठेवल्यास ती सरकारी जमा करण्याबाबतचा कायदा भविष्यात लागू करावा लागेल, असे स्पष्ट संकेत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. पाऊस चांगला झाल्यानंतरही शेतजमीन लागवडीखाली आणली नाही, तर अशा जमिनींवर कारवाई होऊ शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.