मुजोर रिक्षाचालकांवर कारवाई करणार - रावते 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 फेब्रुवारी 2017

मुंबई - भिवंडी बस डेपोत शिरून एसटी वाहनचालकाला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर कडक कारवाईचे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिले. 

मुंबई - भिवंडी बस डेपोत शिरून एसटी वाहनचालकाला बेदम मारहाण करणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांवर कडक कारवाईचे आदेश परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी आज दिले. 

रिक्षाचालकांच्या बेदम मारहाणीत एसटी वाहनचालकाचा मृत्यू झाला, त्याविरोधात राज्यातील विविध एसटी डेपोतील कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत आता रावते यांनी राज्यातील मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात मोहीम राबवण्याचे आदेश दिले आहेत. या मोहिमेत विनापरवाना, बनावट परवाने याचा वापर करून रिक्षा चालवणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षा जप्त करण्याचे आदेश रावते यांनी दिले आहेत. एसटी स्थानकाबाहेर प्रवाशांच्या सोयीसाठी रिक्षा उभ्या करण्यास परवानगी आहे. मात्र, रिक्षावाले त्याचा गैरफायदा घेणार असतील, तर आम्हाला वेगळा विचार करायला लागेल, असा सज्जड दमही रावते यांनी दिला आहे.

Web Title: rickshaw drivers will take action - Raote