अमर्याद जमीन खरेदीचे बिल्डरांना अधिकार

अमर्याद जमीन खरेदीचे बिल्डरांना अधिकार

मुंबई - बांधकाम व्यावसायिकांना घरे बांधण्यासाठी ५४ एकरांपर्यंतच जमीन खरेदीचे असलेले बंधन सरकारने उठवले आहे. आता अमर्याद जमीन खरेदीचे अधिकार देण्यात आले आहेत. या धोरणात्मक निर्णयामुळे बिल्डरांना ‘अच्छे दिन’ येणार असल्याचा सूर विधानसभेत काही आमदारांनी लावला.

महाराष्ट्र शेतजमीन जमीन धारणेची कमाल मर्यादा अधिनियम १९६१ यामध्ये सुधारणा करणारे विधेयक आज विधानसभेत एकमताने मंजूर करण्यात आले. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पाकरिता कमाल मर्यादेच्या पलीकडे धारण करण्यात आलेल्या किंवा कोणत्याही रीतीने संपादित करण्यात येणाऱ्या जमिनीस कमाल मर्यादा अधिनियमाच्या तरतुदीनुसार तोड देण्यासाठी कमाल मर्यादा अधिनियमामध्ये अशी कोणतीही विशेष तरतूद नाही. म्हणून महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम १९६६ यांच्या कलम १८ नुसार घोषित केलेल्या एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी कमाल मर्यादा सूट देण्याकरिता राज्य शासनाने कमाल मर्यादा अधिनियमाच्या कलम ४७ च्या पोटकलम २०० खंड (क) दाखल केले आहे.

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com