'सैराट'च्या आर्चीने दिला दहावीचा पेपर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

'सैराट' या बहुचर्चित लोकप्रिय चित्रपटाची नायिका आर्ची (रिंकू राजगुरू) हिने अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेत आपला दहावीच्या परिक्षेचा आज (मंगळवार) पहिल पेपर दिला. यावेळी तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. केंद्र संचालक तथा मुख्याध्यापिका मंजुश्री जैन यांनी तिचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले.

अकलूज - 'सैराट' या बहुचर्चित लोकप्रिय चित्रपटाची नायिका आर्ची (रिंकू राजगुरू) हिने अकलूज येथील जिजामाता कन्या प्रशालेत आपला दहावीच्या परिक्षेचा आज (मंगळवार) पहिल पेपर दिला. यावेळी तिला पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. केंद्र संचालक तथा मुख्याध्यापिका मंजुश्री जैन यांनी तिचे गुलाबाचे पुष्प देऊन स्वागत केले.

सोलापूर जिल्ह्यासह राज्यभर आज दहावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत. अकलूज येथील जिजामाता कन्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या रिंकू राजगुरू हिला नागराज मंजुळे दिग्दर्शित "सैराट' चित्रपटात काम करायची संधी मिळाली होती. इयत्ता सातवीत शिकत असताना या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे काम सुरू झाले. हा चित्रपट प्रदर्शित झाला त्यावेळी ती नववीत शिकत होती. नववीमध्ये 86 टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण आली. या चित्रपटात तिने साकारलेल्या आर्ची नावाच्या पात्रामुळे ती आर्ची या नावानचे सर्वत्र ओळखली जाऊ लागली आहे. सैराट चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे तिचा "चंदेरी जगता'तील वावर वाढला. या परिस्थितीत दहावीच्या परीक्षेला बहिस्थ विद्यार्थी म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय तिच्या पालकांनी घेतला होता.

जुलै महिन्यात त्यासाठी आवश्‍यक असणारी प्रक्रिया पूर्ण केली होती. त्यानंतर आज ती परीक्षेसाठी जिजामाता कन्या प्रशालेत आली होती. या परीक्षा केंद्रावर सर्वच परीक्षार्थींचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. त्यात रिंकूचा ही समावेश होता. सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमाराला तिचे वडील महादेव राजगुरू तिला आपल्या मोटारीतून घेऊन आले. परीक्षेसाठी तिला विद्यालयाच्या प्रवेशद्वारावर परीक्षेसाठी सोडून ते तेथून निघून गेले. यावेळी अन्य विद्यार्थ्यांप्रमाणे ती विद्यालयाच्या इमारतीत परीक्षेसाठी जाऊन बसली. नेहमी तिच्यासोबत असणारा अंगरक्षकांचा ताफा किंवा कोणतेही वलयांकित वातावरण यावेळी नव्हते.

Web Title: Rinku Rajguru appears for SSC exam