Rohit Patil: रोहित पाटलांचे फेसबुक पेज हॅक; आक्षेपार्ह पोस्ट केल्या जात असल्याची दिली माहिती

Rohit Patil Facebook page hacked: माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहेत
Rohit Patil
Rohit Patil

मुंबई- माजी उपमुख्यमंत्री आर.आर. पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांचे फेसबुक पेज हॅक करण्यात आले आहेत. यावरुन काही आक्षेपार्ह पोस्ट करण्यात येत आहेत. याप्रकरणी रोहित पाटील यांनी माहिती दिली असून आपल्या 'एक्स' अकाऊंटवर त्यांनी यासंदर्भातील पोस्ट शेअर केली आहे.

रोहित पाटील पोस्टमध्ये म्हणालेत की, माझे अधिकृत फेसबुक पेज हॅक झाले असून काही आक्षेपार्ह फोटो पोस्ट केले जात आहेत. सदर अकाउंट रिकव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत असून आपण सर्वांनी सदर ची पोस्ट रिपोर्ट करावे अशी विनंती आहे.निवडणुकीच्या दरम्यान विरोधी पक्षातील लोकांचे अकाउंट हॅक होताना सर्वत्र दिसत असून मी या वृत्तीचा निषेध करतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com