
महिलांवर हात उचलण्याचं समर्थन करत असाल तर...रोहित पवारांचा पाटलांना सवाल
अहमदनगर : पुण्यात सोमवारी (ता.१६) गृहमंत्री अमित शहा यांच्यावरील पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम पार पडला. या प्रसंगी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी बोलत असताना राडा झाला. यावरुन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्यावर टीका केली. त्याला पवार यांनी ट्विट करुन प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणतात, चंद्रकांत दादा मूळ विषय होता महागाईवरील निवेदन स्वीकारण्याचा. पण नेहमीप्रमाणे तो भरकटवण्यासाठी तुमच्या पुरुष कार्यकर्त्यांनी महिलांवर हात उचलण्याचं किळसवाणं कृत्य केलं आणि त्या विरोधात मग चिडलेल्या महिलांनी महिषासुरमर्दिनीचं रुप घेतल्यावर आता आपण अंडं...अंडं म्हणून कांगावा करता !, असा टोला त्यांनी पाटलांना लगावला. (Rohit Pawar Attack On BJP Leader Chandrakant Patil For Twit)
हेही वाचा: डॉ.जाजू दाम्पत्यास अटक; प्रसुतीदरम्यान आई, बाळाचा मृत्यु प्रकरण
महागाई हा मूळ विषय अजून किती दिवस असा भरकटवण्याचा प्रयत्न करणार आहात? संस्कृतीबाबत बोलायचं तर फडणवीस साहेबांवर चप्पल फेकीचा प्रयत्न झाला, तेव्हा त्याचा आम्ही निषेधच केला. चुकीच्या गोष्टीचा निषेध आणि चांगल्या कामाचं कौतुक केलचं पाहिजे, ही आम्हाला साहेबांची नेहमीच शिकवण असते, अशा शब्दांमध्ये रोहित पवार यांनी पाटील यांना सुनावले. आपण मोठे नेते आहात आणि अनेक कार्यकर्ते आपला आदर्श घेत असतात. महिलांवर हात उचलण्याचं आपण समर्थन करत असाल तर समाजात चुकीचा मेसेज जाऊ शकतो, असा सवाल रोहित पवार यांनी पाटील यांना केला आहे.
हेही वाचा: अमेरिकेत तेल टंचाई, ३५ वर्षांमध्ये संरक्षित पेट्रोलियम साठ्यात घट
चंद्रकांत पाटील काय म्हणतात ?
रोहित बाबा, एका केंद्रीय महिला मंत्र्यांच्या पक्ष कार्यक्रमात घुसून गोंधळ, अंडी फेकणं वगैरे वगैरे कुठल्या संस्कृतीत बसत जरा सांगाल ? वयानं आणि अनुभवानं आमच्यापेक्षा ज्येष्ठ नेते असलेल्या शरद पवार यांनीच ही संस्कृती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांमध्ये रुजवली की, त्यामागे दुसराच हात आहे, अशी टीका चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी ट्विट करुन रोहित पवार यांच्यावर केली.
Web Title: Rohit Pawar Attack On Bjp Leader Chandrakant Patil For Twit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..