Rohit Pawar : ''...त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल''

MLA Rohit Pawar Latest News : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधारी भाजपला सुनावलं, जाणून घ्या नेमकं काय प्रकरण?
Rohit Pawar criticizes the BJP for backing Aarti Sathe’s name in the Mumbai High Court judge recommendation, stirring a political storm.
Rohit Pawar criticizes the BJP for backing Aarti Sathe’s name in the Mumbai High Court judge recommendation, stirring a political storm. esakal
Updated on

Rohit Pawar criticizes BJP News : सुप्रीम कोर्टाच्या कॉलेजियमने नुकतीच मुंबई हायकोर्टातील न्यायाधीश पदासाठी तीन वकिलांच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामध्ये आरती अरूण साठे यांचा समावेश आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्षेप घेतला आहे. साठेंची नेमणूक म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात अशी प्रतिक्रियाच रोहित पवारांनी दिली आहे. कारण, आरती साठे या भाजपच्या प्रवक्त्या होत्या, अशी माहिती समोर आलेली आहे.

या पार्श्वभूमीवरच आता रोहित पवारांनी त्यांच्या एक्स अकाउंटवरून एक पोस्ट करत सत्ताधारी भाजपाला सुनावलं आहे. ज्यामध्ये रोहित पवार म्हणातात, न्यायाधीशांची निवड करताना पूर्वी राजकीय नियुक्त्या होत होत्या, त्या रोखण्यासाठीच सध्याची कॉलेजियम पद्धत आणली गेली. आजतरी ही पद्धत सर्वांत योग्य वाटते. पण हायकोर्टाच्या न्यायाधीशांसाठी ६० हून अधिक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या तेंव्हा २० ते ३० टक्के उमेदवारांना केवळ राजकीय पार्श्वभूमीमुळं नाकारण्यात आलं, अशी चर्चा आहे. मग त्याला एकच निवड अपवाद का, असा प्रश्न पडतो.

तसंच, त्यामुळं कॉलेजियमच्या माध्यमातून नियुक्ती करताना राजकीय पार्श्वभूमी तपासलीच पाहिजे शिवाय कोणताही भेदभाव न करता संधीची समानता हे लोकशाहीचं मूल्यही जपलं गेलं पाहिजे, ही माफक अपेक्षा! असं रोहित पवार म्हणाले आहेत.

Rohit Pawar criticizes the BJP for backing Aarti Sathe’s name in the Mumbai High Court judge recommendation, stirring a political storm.
Donald Trump Announces Tariff: ....अखेर डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लावलाच!

याशिवाय, दुसरं म्हणजे इतिहासाचे दाखले देत न्यायाधिशाच्या राजकीय नेमणुकीचं समर्थन करण्यात व्यस्त असलेली भाजपची समस्त भक्त मंडळी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारून घेत आहे. डोक्यावरचं राजकीय छत्र गेल्यावर न्याय मागण्याची वेळ येईल तेंव्हा राजकीय पार्श्वभूमीच्या न्यायाधीशांकडून त्यांना न्याय कसा मिळेल? त्यावेळी आज आपणच पेरलेल्या विषाची जाणीव त्यांना होईल, पण वेळ मात्र गेलेली असेल. असा इशाराही रोहित पवारांनी दिलाय.

Rohit Pawar criticizes the BJP for backing Aarti Sathe’s name in the Mumbai High Court judge recommendation, stirring a political storm.
Trump Tariff India Response: ट्रम्प यांच्या अतिरिक्त टॅरिफवर आता भारतानेही स्पष्ट केली भूमिका अन् दिलं सडेतोड प्रत्युत्तर!

तर देशात तमाम स्वायत्त संस्थांचा एकाधिकारशाहीपुढं कणा वाकला असताना नागरिकांची शेवटची आशा केवळ न्यायव्यवस्था उरते. त्यातही राजकीय नियुक्ती झाल्यास न्यायाची आशा पूर्णतः मावळलेली असेल. मग भविष्यात एखाद्या भांडवलशाहाने हत्तीच काय तुमच्या घरातील एखादी व्यक्ती जरी उचलून नेली तरी न्याय मिळणार नाही. त्यामुळं अंधभक्तांना विनंती आहे, न्यायव्यवस्थेतील राजकीय नियुक्तीचं समर्थन करु नका आणि लोकशाहीतील सर्वांत विश्वासू स्तंभाला पोखरण्याच्या प्रयत्नांना खतपाणी घालू नका…! असं आवाहनही रोहित पवार यांनी आपल्या पोस्टद्वारे केलंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com