
थोडक्यात
आदिवासी बांधवांना जनावरं देण्याची चर्चा सुरू असताना कृषिमंत्री मोबाईल गेममध्ये व्यस्त
विधिमंडळाच्या प्रतिष्ठेसाठी आवाजाशिवाय व्हिडीओ शेअर केलेले, नाईलाजाने सत्य जनतेच्या कोर्टात आणावं लागतंय - रोहित पवार
पत्त्यांची कोणती जाहिरात स्किप करायला ४२ सेकंद लागतात? रोहित पवारांचा सवाल
राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा विधानसभेच्या सभागृहात गेम खेळत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राज्यातलं वातावरण तापलं आहे. विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करताना कृषिमंत्री कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केलीय. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सुरुवातीला एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानंतर सगळा गदारोळ सुरू झाला आहे. आता माणिकराव कोकाटे यांनी मी गेम खेळत नव्हतो तर ती जाहिरात होती आणि स्कीप करता येत नव्हती अशी सारवासारव केली. यानंतर पुन्हा रोहित पवार यांनी नवे व्हिडीओ शेअर केले आहेत.