Rohit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडायचं भाजपाचं टार्गेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit Pawar Shivsena NCP
Rohit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडायचं भाजपाचं टार्गेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

Rohit Pawar : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फोडायचं भाजपाचं टार्गेट; रोहित पवारांचा खळबळजनक आरोप

शिवसेना फोडल्यानंतर आता विरोधकांना राष्ट्रवादी फोडायचा आहे, असा आरोप आमदार रोहित पवारांनी केला आणि त्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ माजली आहे. रोहित पवार यांनी नुकतंच एका इंग्रजी वृत्तपत्राला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना त्यांनी हे आरोप केले आहेत. तसंच आपल्या आणि अजित पवार यांच्यातल्या संबंधांवरही भाष्य केलं आहे.

हेही वाचा: Nitesh Rane : छत्रपती शिवरायांपेक्षा शरद पवार मोठे?; रोहित पवार वादात

रोहित पवार यांना त्यांच्या अजित पवार यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल विचारण्यात आलं. तुम्हा दोघांमध्ये तणाव आहे का, असा प्रश्नही त्यांना विचारण्यात आला. याला उत्तर देताना पवार म्हणाले, "मला जिल्हा परिषद निवडणुकीत पहिलं तिकीट अजित पवार यांनी दिलं. मला आमदारकीचं तिकीटही त्यांनी दिलं. एवढंच काय माझं लग्नही अजित पवारांनीच जमवलं आहे. तुम्हाला जेव्हा प्रगती करायची असते, तेव्हा कुटुंबात तुम्ही स्पर्धा करू शकत नाही. आमचे ध्येय वेगळे आहे. "

हेही वाचा: LIVE Updates: भाजपचा मोठा डाव, शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादीही फोडणार; रोहित पवार यांचा दावा

कुटुंबातल्या संबंधांबद्दल बोलताना रोहित पवार म्हणाले, "आमचं ध्येय वेगळे आहे. सुप्रियाताई यांचं टार्गेट लोकसभा आहे, अजितदादा राज्यात काम करतात आणि मी माझ्या मतदारसंघात. पण विरोधकांना आमचं कुटुंब फोडायचं आहे. विरोधकांना वाटतं की कुटुंबात अंतर्गत वाद झाले तर पक्ष फुटेल. जसं त्यांनी शिवसेना पक्ष फोडला, तसं शिवसेनेनंतर राष्ट्रवादी पक्ष त्यांचं टार्गेट आहे. "