Rohit Pawar : रोहित पवारांच्या राजकीय भूकंपाच्या दाव्याला शिंदे गटाचं प्रत्युत्तर; म्हणाले तुम्ही...

Rohit Pawar and Eknath Shinde
Rohit Pawar and Eknath Shinde

मुंबई - "भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांचं वर्तन बदलत असतं. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचं माझं आजचं निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची आज कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या, त्यामुळे राज्यात राजकीय भूकंप होणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. त्याला शिंदे गटाने प्रत्युत्तर दिलं.

Rohit Pawar and Eknath Shinde
Shinde Vs Thackeray : "न्यायालय देखील चुकू शकतं" ; उल्हास बापट असं का म्हणाले?

रोहित पवारांच्या टीकेवर मंत्री शंभुराज देसाई म्हणाले की, रोहित पवार मनकवडे आहेत का? तुम्ही आमच्या ५० आमदारांची चिंता करण्याचं कारण नाही. आमच्या आमदारांची चेहरे ओळखण्याचं काम करू नका. तुमच्या आमदारांच्या चेहऱ्यांवर असलेल्या अस्वस्थतेची चिंता करा, असा सल्ला देसाई यांनी रोहित पवारांना दिला.

"(शिंदे गटाच्या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती. सत्ताधारी असूनही काही आमदारांना मुख्यमंत्र्यांना भेटता येत नसल्याचं समजलं. शिवाय अर्थ विभागातून विशिष्ट पक्षाच्याच फायली मंजूर होत असून त्याचा वेगही अचानक वाढल्याचं समजलं. ही कोणत्या भूकंपाची चिन्ह असावीत?, असा प्रश्न रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com