Vidhan Sabha 2019 : पवारसाहेब अजितदादांच्या वडिलांसारखे : रोहित पवार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 सप्टेंबर 2019

राज्यात सध्या पूर परिस्थिती आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना फक्त आणि फक्त विरोधक या गोष्टी समोर आणून वेळ पाहत आहेत.

- रोहित पवार.

पुणे : अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर मोबाईल बंद ठेवून तब्बल 18 तास ते 'नॉट रिचेबल' होते. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी त्यांचे सकाळी बोलणे झाले, असे अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार यांनी सांगितले. तसेच पवारसाहेब हे अजितदादांच्या वडिलांसारखे आहेत, असेही ते म्हणाले.

बारामतीतील कऱ्हा नदीला आलेल्या पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रोहित पवार आले होते. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, केवळ मी यामध्ये असल्यानेच मला टार्गेट केले जात आहे, असा आरोप अजित पवार यांनी केला. बँकेतील कारवाईत मोठी आकडेवारी करून ते फक्त पवार कुटुंबाला टार्गेट करत असतील तर अजित पवारदेखील माणूसच आहे, असे म्हणत रोहित पवार यांनी आपली बाजू मांडली.

Vidhan Sabha 2019:युतीचं काही ठरेना; काय चाललंय भाजप-शिवसेनेचं?

दरम्यान, राज्यात सध्या पूर परिस्थिती आहे. अनेक समस्यांनी ग्रासलेले असताना फक्त आणि फक्त विरोधक या गोष्टी समोर आणून वेळ पाहत आहेत, असेही रोहित पवार यांनी सांगितले.

व्यथित अजितदादांचे भावूक ‘कमबॅक’!

अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास

अजित पवार यांच्यावर आमचा विश्वास आहे. ते जो काही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तसेच बैठकीला जाऊन गर्दी करण्यास योग्य नव्हते. त्यामुळे गेलो नाही, असेही ते म्हणाले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rohit Pawar statement on Ajit Pawar and Sharad Pawar Maharashtra Vidhan Sabha 2019