Rohit Pawar : IPS अंजना कृष्णा प्रकरणात अजितदादांची बाजू घेत, आता रोहित पवारांनी केला भलताच आरोप!

Rohit Pawar backs Ajit Pawar in IPS Anjana Krishna case : याप्रकरणी खुद्द अजित पवार यांनीही भूमिका स्पष्ट केलेली आहे; जाणून घ्या, नेमकं काय म्हणाले आहेत रोहित पवार?
NCP leader Rohit Pawar supports Ajit Pawar in the IPS Anjana Krishna case, intensifying political tensions in Maharashtra.

NCP leader Rohit Pawar supports Ajit Pawar in the IPS Anjana Krishna case, intensifying political tensions in Maharashtra.

esakal

Updated on

Rohit Pawar Defends Ajit Pawar in IPS Anjana Krishna Case : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील डेप्युटी सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस अंजना कृष्णा सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत फोनवर त्यांच्या झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ देखील प्रचंड व्हायरल होत आहे. या फोनकॉलमध्ये अजित पवार हे ज्या प्रकारे बोलले आहेत, त्यावरून त्यांच्यावर टीकाही होत आहे आणि त्या व्हिडिओवर संमिश्र प्रतिक्रियाही उमटत आहेत.

या दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट केंद्रीय लोकसेवा आयोगाला पत्र पाठवून आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची चौकशीची मागणी केली आहे. त्यावर अंजली दमानिया यांनी कठोर टीका करत, मिटकरींना इशाराही दिलेला आहे. तर दुसरीके राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरेंनी अजितदादांचा आवाजच तसा असल्याचे सांगत बाजून सावरण्याचा प्रयत्न केलाय. शिवाय यावर खुद्द अजित पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. याच दरम्यान आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही अजित पवारांची बाजू घेतली आहे आणि भलताच आरोप केला आहे.

रोहित पवार यांनी काय आरोप केलाय? -

रोहित पवार यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये ते म्हणतात, ‘’राज्यात शेतकरी कर्जमाफी, अवकाळी पावसाने झालेलं नुकसान असे अनेक प्रश्न आहेत, पण त्यावर चर्चा होण्याऐवजी सध्या करमाळा येथील महिला पोलिस अधिकारी आणि अजितदादा यांच्यातील संभाषणाचीच अधिक चर्चा होताना दिसते. वास्तविक अजितदादा सहज बोलले तरी ते रागावले, संतापले असं त्यांना भेटणाऱ्या नवख्या माणसाला वाटतं. पण अजितदादांची कार्यपद्धती, स्वभाव आणि स्पष्टवक्तेपणा गेली ३५-४० वर्षे संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे.’’

NCP leader Rohit Pawar supports Ajit Pawar in the IPS Anjana Krishna case, intensifying political tensions in Maharashtra.
Anjali Damania warn Mitkari : IPS अंजना कृष्णा यांच्या चौकशीची मागणी करणाऱ्या मिटकरींना दमानियांनी भरला दम, म्हणाल्या...

 तसेच ‘’करमाळा प्रकरणात संबंधित महिला अधिकाऱ्याचीही कोणतीही चूक नाही. पण अजितदादांच्या फोन कॉलमधील संभाषणाला जाणीवपूर्वक वेगळं वळण देऊन मित्रपक्षांकडूनच टार्गेट करण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसतं. आम्ही विरोधात असलो तरी माझा स्वभाव हा कायम खऱ्याला खरं म्हणण्याचा आहे, त्यामुळं आपल्याच मित्रांकडून कसा सापळा रचला जातो, हेही अजितदादांनी यानिमित्ताने लक्षात घ्यायला हवं. आम्ही मात्र नको त्या वादात तेल न घालता खऱ्या प्रश्नांकडं सरकारचं लक्ष वेधत राहू.’’ असंही रोहित पवारांनी म्हटलंय.

NCP leader Rohit Pawar supports Ajit Pawar in the IPS Anjana Krishna case, intensifying political tensions in Maharashtra.
Donald Trump : ट्रम्प यांना उपरती! अतिरिक्त 'टॅरिफ' लादल्यानंतर आता भारताबद्दल केलंय मोठं विधान, म्हणाले...

अजित पवारांनी काय म्हटलंय? –

तर याप्रकरणी आपली बाजू स्पष्ट करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की, ‘’सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबतच्या संवादाच्या संदर्भात काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित होत आहेत. मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की, माझा उद्देश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर त्या ठिकाणी परिस्थिती शांत रहावी आणि ती अधिक बिघडू नये याची काळजी घेण्याचा होता.’’

NCP leader Rohit Pawar supports Ajit Pawar in the IPS Anjana Krishna case, intensifying political tensions in Maharashtra.
Ajit Pawar: उलट्या बोंबा! अजित पवारांना सडेतोड उत्तर देणाऱ्या आयपीएस अंजना कृष्णा यांच्या चौकशीची मागणी, यूपीएससीला पत्र

याशिवाय ‘’आपल्या पोलीस दलाबद्दल तसंच धैर्यानं आणि प्रामाणिकपणे आपलं कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकाऱ्यांबद्दल मला सर्वोच्च आदर आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. मी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आणि बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशासह प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई करण्यासाठी कटिबद्ध आहे.’’ असंही अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com