मंत्रिमंडळ विस्तारात रिपाइंचे अविनाश महातेकर; आठवलेंची माहिती

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 15 जून 2019

उद्या रविवारी होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती आठवले दिली आहे.

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या (रविवारी) सकाळी 11 वाजता राजभवन येथे होत असून, यामध्ये भाजप शिवसेनेच्या मंत्र्यासोबत रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस अविनाश महातेकर हे सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी रिपब्लिकन पक्षातर्फे महातेकर यांचे नाव अधिकृतरित्या मुख्यमंत्र्यांकडे पाठविले असल्याची माहिती रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

उद्या रविवारी होणाऱ्या राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात रिपब्लिकन पक्षातर्फे एक नाव देण्याची सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपणास केल्यानंतर अविनाश महातेकर यांच्या नावाची शिफारस पाठविली असल्याची माहिती आठवले दिली आहे.

उद्या होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीयराज्यमंत्री आठवले प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महायुती सरकारमध्ये रिपब्लिकन पक्षाला सत्तेचा वाटा देण्यात येईल आणि मंत्रीमंडळात एक मंत्रिपद देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करीत असल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आठवले यांनी आभार मानले आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI leader Avinash Mahatekar included Maharashtra cabinet