
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) राज्यातील खासगी शाळांमध्ये प्रवेशासाठी राबविण्यात येणार्या ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची सोडत सोमवारी जाहीर करण्यात आली. यामध्ये राज्यातील किती खासगी शाळांमध्ये किती विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे? याची माहिती जाणून घ्या. तसंच या सोडतीत प्रवेश जाहीर झालेल्या मुलांची माहिती पालकांना मेसेजद्वारे 14 फेब्रुवारीपासून पाठविण्यात येणार आहे.