
How Brain Takes Decisions: तुम्हाला एखाद्या गंभीर विषयावर निर्णय घ्यायचा आहे पण तुम्ही संभ्रमात आहात. परंतू कसंतरी तुम्ही निर्णयाप्रत पोहोचता, पण तुमची ही निर्णय प्रक्रिया कशी घडली? याचा तुम्ही विचार केला आहे का? खरंतर अशा प्रकारे निर्णय घेण्यासाठी मेंदूमधील यंत्रणा काम करत असते, हीच यंत्रण नेमकी काय असते याचा शोध आता वैज्ञानिकांनी घेतला आहे. प्रिन्स्टन युनिव्हर्सिटीच्या न्यूरोसायंटिस्ट्सनी केलेल्या अभ्यासानुसार निर्णय घेताना मेंदू वेगवेगळ्या संकेतांवर, जसं की दृष्टी आणि आवाजांवर कशी प्रक्रिया करतो यावर प्रकाश टाकला आहे.