Supriya Sule : ''लेकीने माहेरी लुडबुड करु नये...'' चाकणकरांच्या टीकेला सुषमा अंधारेंचं सणसणीत उत्तर

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांबद्दल केलेल्या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी फेसबुकर एक दीर्घ पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिलं. हीच पोस्ट शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली असून त्याला आणखी चार ओळींची जोड दिली आहे.
sushma andhare rupali chakankar
sushma andhare rupali chakankaresakal

मुंबईः राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांबद्दल केलेल्या विधानाचा ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी समाचार घेतला आहे. त्यांनी फेसबुकर एक दीर्घ पोस्ट लिहून प्रत्युत्तर दिलं. हीच पोस्ट शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केली असून त्याला आणखी चार ओळींची जोड दिली आहे.

सुषमा अंधारेंचं चाकणकरांना उत्तर

प्रति,

रुपाली चाकणकर

श्रीमती सुनेत्रा पवार यांच्या प्रचार सभेतलं आपलं भाषण ऐकण्याचा योग आला. आपण ज्या तावा- तावाने खासदार सुप्रिया सुळे यांच्या बद्दल बोललात. का बोललात ? कोणत्या लोभापोटी बोललात ? कोणत्या स्वार्थाने पछाडलेल्या आहात ? सुप्रिया सुळे किंवा पवार कुटुंबीयांनी आपल्यावर काय उपकार केले ? आपली एकूण किती पकड आहे आणि आपण किती जनमानसामध्ये उतरून काम करता यावर मला अजिबात टिप्पणी करण्यामध्ये रस नाही.

''पण काल प्रचार सभेमध्ये बोलताना आपण, " लेकीने माहेरी लुडबुड करू नये" अशा आशयाचे जे वक्तव्य केले हे महिला म्हणून तर अत्यंत निंदनीय आहे परंतु महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून काम करणाऱ्या एका व्यक्तीने केलेले वक्तव्य म्हणून चिंतनीय आहे. रूपालीजी महिला आयोग म्हणून आपण जेव्हा कधी अधिकार वापरले ते फक्त आणि फक्त स्वतःवर कधी समाजमाध्यमांमधून टीका टिप्पणी झाली तर त्यासाठी म्हणून ते वापरले गेले. पण इतर महिलांवर कधी जर अभद्र टिप्पण्या झाल्या तर आपण कधीही स्वतःहून त्याची दखल घेतली नाही. कारण अशा काळात जेव्हा एखादी महिला सैरभैर होते अडखळते.. अडते.. नडते.. तेव्हा तिच्या पाठीशी ठामपणे उभं असतं ते तिचं कुटुंब.''

sushma andhare rupali chakankar
Supreme Court : ''एखाद्याला तुरुंगात ठेवण्यासाठी सातत्याने पुरवणी आरोपपत्र सादर करुन जामीनाला विरोध करणं त्रासदायक'' कोर्टाने ED ला फटकारले

''सासर आणि माहेर दोन्हीकडचे लोक. कित्येक कुटुंबांमध्ये आपल्या वृद्ध माता-पित्यांची काळजी त्यांची अपत्ये घेतात. ज्यांना एकच अपत्य आहे आणि विशेषता ती मुलगी आहे अशा स्थितीमध्ये त्या वृद्ध माता पित्यांची काळजी कुणी बरे घ्यायला हवी? सुप्रिया सुळे या आदरणीय पवारसाहेबांच्या एकमेव कन्या आहेत हे ज्ञात असेलच आपल्याला. विशेषता मुलगा असो की मुलगी असो, एकच अपत्य असायला हवे असे ठरवून सुप्रिया सुळे या एकुलत्या एक कन्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये आपल्या 84 वर्ष वयोवृद्ध पित्याला अनेक आजारांनी ग्रासलेलं असताना ज्यांच्यासाठी रक्ताचे पाणी केलं जीव झिजवला. ऊन वारा पावसाची झळ लागू नये म्हणून काळीज कप्प्यामध्ये जपलं. अशा आपल्याच म्हणणाऱ्यांनी विश्वासघाताचे सपासप वार करून त्या वृद्ध पित्याला त्याच्या असंख्य भावभावनांना रक्तबंबाळ केलं. आपल्याच लोकांनी केलेल्या विश्वासघाताच्या थारोळ्यात पडलेल्या पवारसाहेबांना अशावेळी आधार कोण देणार?''

''गुणवत्ता नसतानाही ज्यांना संघटनेची आणि अनेक संविधानिक संस्थांची अध्यक्ष पदं मिळाली असे लोक की अत्यंत निरपेक्ष आणि निस्वार्थपणे आपला बाप या सगळ्या असुरी शक्तींशी लढतोय तो एकटा पडता कामा नये असं म्हणत पदर खोचून उभी राहिलेली लेक? 84 वर्ष वयोवृद्ध एकाच वेळी शारीरिक आजारांशी आणि आपल्याच रक्ता माणसांच्या नात्यातल्या लोकांनी केलेले वार झेलणाऱ्या आपल्या बापाला आधार देणारी लेक म्हणजे लुडबुड असं जर तुम्हाला वाटत असेल तर संवेदनशीलता हा शब्द तुम्हाला नव्याने शिकवण्याची गरज आहे. तुमच्या या वाक्याने मला फरक पडतो आणि मलाच का माझ्यासारख्या असंख्य आईबापांना तो फरक पडेल.''

''ज्यांना एकच आपत्य आणि तीही मुलगी असेल. तुमचं वाक्य हे भलेही तुम्ही राजकीय अभिनिवेषने उच्चारले असेल मात्र ते मुलगा मुलगी असा लिंगभाव करणारे वाक्य आहे. मुलींचे अधिकार नाकारणारे वाक्य आहे. रूपालीजी, उगवतीच्या सूर्याला नमस्कार करणारे आणि मावळतीच्या सूर्याचा नजारा बघणारे अनगिनत असतात. त्यात तुमची एक भर पडली तर नवल ते काय ? पण मावळतीचा सूर्य दिवसभर आपल्यासाठी कष्टत राहिलाय. अख्या जगाचा दाह त्याने पचवलाय. याची जाणीव ठेवत मावळतीच्या वेळी त्याच्या प्रति कृतज्ञतेने उभ राहणं याला माणुसकी म्हणतात.''

''असो तुमचा आणि अशा माणुसकीचा फार परिचय झालेला दिसत नाही. आपल्यात थोडी जरी सहसंवेदना शिल्लक असेल आणि अमुक एका पक्षाच्या पदाधिकारी म्हणून नाही तर राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून त्या पदाची गरिमा आणि राज्यातील फुले-शाहू-आंबेडकरांचा वैचारिक वसा वारसा कळत असेल तर आपण आपले शब्द परत घ्याल, अशी अपेक्षा आहे. (अर्थात ती फोल ठरेल म्हणा)''

-सुषमा अंधारे

मला ही एकच मुलगी आहे नताशा. मी कोरोना च्या काळात आजारी असतांना आणि त्यानंतर माझी काळजी घेऊन देखभाल करणारी तीच होती. आजही माझा जरा मूड खराब असेल तर १० मित्रांना फोन करुन चौकशी करते काय झाले बाबांना.. मुलगी म्हणजे देवाचा आशीर्वाद

- जितेंद्र आव्हाड

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com