esakal | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत
sakal

बोलून बातमी शोधा

रुपाली चाकणकर

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकरांचं नाव चर्चेत

sakal_logo
By
रश्मी पुराणिक

मुंबई: राज्य महिला आयोगाचं अध्यक्षपद‌ (State women commission president) राष्ट्रवादी काँग्रेसकडे (ncp)‌ जाण्याची शक्यता आहे. महामंडळ वाटपात राज्य महिला आयोगासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आग्रही असल्याची माहिती आहे. महिला आणि बालकल्याण खाते काँग्रेसकडे असल्यामुळे राज्य महिला आयोग राष्ट्रवादीच्या वाट्याला येऊ शकते. आयोगाच्या अध्यक्षपदासाठी रुपाली चाकणकर, (Rupali chakankar) विद्या चव्हाण (Vidya chavan) यांची नावं चर्चेत आहेत.

रुपाली चाकणकर आणि विद्या चव्हाण या दोघीही महिलांच्या प्रश्नावर वेळोवेळी आवाज उठवत असतात. राष्ट्रवादी महिला काँग्रेसचं प्रदेशाध्यक्षपद रुपाली चाकणकर यांच्याकडे आहे. अत्यंत कमी वेळात महाराष्ट्रात राष्ट्रवादीची महिला आघाडी समर्थ करण्यात त्यांचा महत्वाचा वाटा आहे.

हेही वाचा: पत्नी, सासू-सासऱ्यांच्या छळाला कंटाळून अधिकाऱ्याची आत्महत्या

दौंडमधील शेतकरी कुटुंबात रुपाली चाकणकर यांचा जन्म झाला. त्यांचे शिक्षण रयत संस्थेतील साधना कॉलेजमध्ये झाले. पुढे त्यांनी अधिकारी होण्यासाठी स्पर्धा परीक्षांचाही अभ्यास केला. लग्नानंतर सासरच्या चाकणकर कुटुंबाला राजकीय पार्श्वभूमी असल्याने पुढे रुपाली चाकणकर यांच राजकारणात प्रवेश झाला. नगरसेविका ते प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा प्रवास आहे.

हेही वाचा: काबुलमध्ये भारतीय वंशाच्या शीख व्यावसायिकाचे अपहरण

अलीकडेच वर्ध्याचे (vardha) भाजपा खासदार रामदास तडस (bjp mp ramdas tadas) यांच्या सुनबाईने सासरकडच्या मंडळींवर अत्याचार करत असल्याचा आरोप केला होता. सासरकडची मंडळी मारहाण करत असल्याचा आरोप केला होता. त्यावेळी राष्ट्रवादीच्या (ncp) महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर (rupali chakankar) पूजाच्या मदतीला धावून गेल्या होत्या.

loading image
go to top