esakal | संवेदनाहीन मनाचं, अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी - चाकणकर
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta fadnavis rupali chaknakar

"संवेदनाहीन मनाचं, अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी"

sakal_logo
By
अमित उजागरे

पुणे : लखीमपूर घटनेविरोधात मविआ सरकारनं पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदवर अमृता फडणवीस यांनी ट्वीटद्वारे सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. "संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी," अशा शब्दांत त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांचं ट्वीट शेअर करत रुपाली चाकणकर यांनी म्हटलं, "वहिनींच्या गाण्यात सूरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी"

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं गाडी चढवल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेटमध्ये ठराव करुन आजच्या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यापूर्वी परमबीर सिंग प्रकरणात राज्य सरकारवर वसूलीचे आरोप झाले होते. तो धागा पकडत आणि आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी सरकारला टार्गेट केलं. #MaharashtraBandhNahiHai असा हॅशटॅग वापरत "आज वसूली चालू है या बंद?" असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

loading image
go to top