चाकणकरांवर अश्लील कमेंट करणाऱ्याची पत्र लिहून त्यांच्याकडेच तक्रार

चाकणकर यांच्या पोस्टवर अनेकांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेतही कमेंट्स केल्या आहेत
rupali chakankar latest news
rupali chakankar latest news
Summary

चाकणकर यांच्या पोस्टवर अनेकांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेतही कमेंट्स केल्या आहेत

'लग्नानंतर मी एकदाही वड पूजला नाही' असे म्हणत रुपाली चाकणकर यांनी वटपौर्णिमच्या दिवशी सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. या पोस्टनंतर त्यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता. रुपाली चाकणकर यांच्या या फेसबुक पोस्टवर अनेकांनी टीकात्मक प्रतिक्रिया दिल्या होत्या. (rupali chakankar latest news)

दरम्यान, चाकणकर यांच्या पोस्टवर अनेकांनी अर्वाच्य आणि अश्लील भाषेतही कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे याची दखल घेत शिक्षणतज्ज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni)यांनी याविरोधात फेसबुक पोस्ट लिहून रुपाली चाकणकर यांच्याविषयी आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे.

rupali chakankar latest news
चंद्रकांत पाटील म्हणाले, अजित पवारांच्या अपमानाचा विषयच नाही, कारण...

फेसबुक पोस्टमध्ये हेरंब कुलकर्णींनी काय म्हटलंय?

मीच तुमच्याकडे तुमच्यावरच्या अश्लील comment ची तक्रार करतो आहे. महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची काल मी वटपौर्णिमेला वडाला जात नाही अशा प्रकारची एक भूमिका आली. त्यांच्या एका भाषणाच्या आधारे ती पोस्ट बनवली गेली. त्यात त्यांनी महिलांनी वटपौर्णिमेला जाऊ नये असे कुठेही म्हटलेले नाही. फक्त मी स्वतः जात नाही, हे सांगितले व त्याच वेळी सत्यवानाची सावित्री समाजाला लवकर कळली. सावित्रीबाई अजून कळत नाही किंवा कळायला हवी अशी भावना व्यक्त केली.

यात खटकण्यासारखे काहीच नव्हते. लोकानुरंजी भूमिका राजकीय पक्ष घेत असताना त्यांनी गोलमाल न बोलता अतिशय धाडसाने हे मांडले. हे अपवादात्मक व कौतुकास्पद आहे. त्यांच्या वेगवेगळ्या पोस्ट खालच्या कमेंट आवर्जून बघितल्या तेव्हा अक्षरशः लाज वाटली. मला ते टाकताना लाज वाटते आहे पण अतिशय अश्लील भाषेत अनेक कमेंट आहे.

rupali chakankar latest news
पॉवरफुल अदानी बारामतीत, आमदार रोहित पवारांनी केले 'सारथ्य'

सध्या सोशल मिडियावर स्त्रियांच्याबाबत हिम्मत किती वाढली आहे याचे हे त्याचे उदाहरण आहे. अमृता फडणवीस यांच्या भूमिका मान्य असो किंवा नसो त्यांच्याबाबतीत अशाच अत्यंत अश्लील भाषेत कमेंट फडणवीस मुख्यमंत्री असल्यापासून सुरु आहेत, असंही ते म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com