
शिवसेना, बाबरी आणि फडणवीसांचे वय; रुपाली ठोंबरेंची बोचरी टीका
मुंबई : काल देवेंद्र फडणवीसांनी मुंबईत बूस्टर डोस सभा घेतली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत टीका केली आहे. सध्या चाललेल्या हनुमान चालीसा प्रकरणावरुन आणि भोंग्याच्या प्रकरणावरुन त्यांनी शिवसेनेवर टीका केली होती. या प्रकरणात आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी उडी घेतली असून त्यांनी फडणवीसांवर बोचरी टीका केली आहे.
काल राज ठाकरे यांनी औरंगाबाद येथे जाहीर सभा घेत मशिदीवरील भोंगे काढण्याचा इशार दिला आहे. त्याचबरोबर भाजपाने बूस्टर डोस सभा घेऊन शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बाबरी मशिद पाडली तेव्हा शिवसेना कुठं होती? असा प्रश्न फडणवीस यांनी सभेत उपस्थित केला होता. तसेच राज ठाकरे यांनी त्यांच्या औरंगाबादच्या सभेत सगळ्यात जास्त शरद पवार यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली असून भाजपावर आणि राज ठाकरे यांच्यावर त्यांनी निशाना साधला आहे.
हेही वाचा: 52 रुपयांना बीअर अन् 350 रुपयाला रम; गुजरातमध्ये दारुचे भाव एवढे कमी?
काही प्रवृत्तीकडून राज्यात जातीय दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. राज ठाकरे यांच्या कालच्या भाषणात अनेक वादग्रस्त मुद्दे आले आहेत. त्याबद्दल पोलिस चौकशी करत असून कारवाई केली जाईल असं त्या बोलताना म्हणाल्या. तसेच फडणवीस यांनी बाबरी मशिदीवेळी शिवसेना कुठे होती या वक्तव्यावर बोलताना म्हणाल्या की, बाबरी मशिद पाडली त्यावेळी फडणवीस यांचं वय काय होतं? असा सवाल त्यांनी यावेळी विचारत बोचरी टीका केली आहे.
हेही वाचा: तिघींसोबत 15 वर्षे लिव्हइनमध्ये राहिला; झाली 6 मुले अन्...
दरम्यान काल फडणवीसांनी भाषणात बोलताना बाबरी मशिद पाडली तेव्हा आपण तिथे होतो असं म्हटलं होतं. त्यानंतर राज ठाकरे यांनीही कालच्या औरंगाबादच्या भाषणात शरद पवार आणि शिवसेनेवर टीका केली होती. त्यानंतर रुपाली ठोंबरे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या आहेत.
Web Title: Rupali Thombare On Devendra Fadanavis Babri Shivsena
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..