mp supriya sule
sakal
कऱ्हाड - राज्य सरकारच्या लाडकी बहिण योजनेतून आत्तापर्यंत २६ लाख महिलांना वगळण्यात आले आहे. योजनेचा लाभ घेण्यास त्या महिलांना सरकारने मनाई केली आहे. त्या योजनेत चार हजार ९०० कोटींचा भष्ट्राचार झाला आहे. ते पैसे परूषांनी काढले असे सरकार म्हणत आहे.
मात्र कोणत्या पुरूषांनी काढले, त्यापुढे काय कार्यवाही केली, याचे उत्तर सरकारला द्यावेच लागेल, असे आव्हान खासदार सुप्रिया सुळे यांनी आज येथे झालेल्या पत्रकार परिषेदत केला.