esakal | प्राथमिक शिक्षकांसाठी गुड न्युज ; मंत्री मुश्रीफ यांनी दिला 'हा' शब्द...
sakal

बोलून बातमी शोधा

Rural Development Minister Hasan Mushrif has promised to transfer primary teachers in the state

ऑनलाईन बदल्यामुळे राज्यातील शिक्षकांच्या गेल्या दोन वर्षात गैरसोयी झाल्या आहेत.

प्राथमिक शिक्षकांसाठी गुड न्युज ; मंत्री मुश्रीफ यांनी दिला 'हा' शब्द...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोल्हापूर - राज्यातील प्राथमिक शिक्षकांच्या जुलै अखेर सोयीच्या बदल्या करण्याचे आश्वासन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्राथमिक शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास दिले.

कोरोना संकटामुळे राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या यावर्षी न करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.तथापि ऑनलाईन बदल्यामुळे राज्यातील शिक्षकांच्या गेल्या दोन वर्षात गैरसोयी झाल्या आहेत. यापूर्वी बदलीत विस्थापित झालेल्या तसेच संवर्ग 1 व 2 मधील शिक्षकांच्या सोयीच्या बदल्या करण्याची मागणी मंत्री मुश्रीफ यांनी कॅबिनेटच्या बैठकीत केली.त्यास मंत्रिमंडळाने परवानगी दिल्याने जुलै अखेर बदल्या करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

वाचा - भारीच की पैलवान मंडळी ! राजर्षी शाहू जयंती निमित्त गंगावेशच्या मल्लांनी केला 'हा' संकल्प...

राज्यात महाविकास आघाडीचे शासन सत्तेवर येताच त्यांनी शिक्षकांचे नवीन बदली धोरण ठरविण्यासाठी बदली अभ्यास गट समिती स्थापन केली.या समितीने सर्वसमावेशक बदली धोरण शासनास सादर केले.परंतु कोरोनामुळे पुढील सर्व प्रक्रिया ठप्प झाली परंतु आता
विशेष संवर्गातील शिक्षकांच्या जुलै अखेर बदल्या करण्यासाठी बदली अभ्यास गटाला सॉफ्टवेअर तयार करण्यास सांगितले आहे.त्यामुळे जुलैअखेर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या होणार आहेत. शिष्टमंडळात शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे,बँकेचे अध्यक्ष नामदेव रेपे,संचालक जी. एस.पाटील,राजमोहन पाटील, बाजीराव कांबळे,तुकाराम राजूगडे,एच.एन.पाटील आदींचा सहभाग होता.

 

loading image
go to top