Russia-Ukraine War : 'विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारनं उचलावा' I Prithviraj Chavan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Prithviraj Chavan

रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत.

Russia-Ukraine War : 'विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारनं उचलावा'

Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धाला पाच दिवस पूर्ण झाले आहेत. या पाच दिवसांमध्ये रशियन फौजांनी युक्रेनवर जोरदार हल्ला चढवलाय. रशियाच्या हल्ल्यात युक्रेनचं मोठं नुकसान झालंय. रशियन हल्ल्याला युक्रेनकडून जोरदार प्रत्युत्तर दिलं जात आहे.

या संघर्षादरम्यान, महाराष्ट्रातील दोन हजार विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले आहेत. युध्दामुळं विद्यार्थ्यांचे राहण्याचे आणि जेवणाचे हाल होत आहेत. विद्यार्थी कसेबसे युक्रेनच्या सीमेवर पोहोचून शेजारील देशांत आसरा घेऊन ते भारतात परतण्यासाठी आटापिटा करत आहेत. त्यांच्या विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारनं उचलावा, अशी मागणी ट्विटव्दारे माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी केलीय.

हेही वाचा: Russia-Ukraine War : लग्न होताच दाम्पत्याला हाती घ्यावी लागली बंदूक

राज्यातील 2 हजारहून अधिक विद्यार्थी युक्रेनमध्ये अडकले असल्याचा अंदाज आहे. त्यांच्यासाठी शेजारील देशांतून भारताकडं येणाऱ्या एकेरी विमान भाड्याचा खर्च महाराष्ट्र सरकारनं (Government of Maharashtra) उचलावा, जेणे करुन हे विद्यार्थी भारतात सुखरुप परततील, असं त्यांनी नमूद केलं.

Web Title: Russia Ukraine War Cost Of Airfare Should Be Paid By The Maharashtra Government Prithviraj Chavan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top