‘साम टीव्ही’तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Honor

विविध क्षेत्रांत आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील ३० कर्तृत्ववान गुणवंतांना ‘साम टीव्ही’तर्फे ‘लीडिंग आयकॅान्स ऑफ महाराष्ट्र’ या पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले.

‘साम टीव्ही’तर्फे विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सन्मान

पुणे - विविध क्षेत्रांत आपल्या उल्लेखनीय कामगिरीचा ठसा उमटविणाऱ्या राज्याच्या वेगवेगळ्या भागांतील ३० कर्तृत्ववान गुणवंतांना (Meritorious People) ‘साम टीव्ही’तर्फे (Saam TV) ‘लीडिंग आयकॅान्स ऑफ महाराष्ट्र’ (Leading Icons of Maharashtra) या पुरस्काराने (Award) नुकतेच गौरविण्यात आले.

या सोहळ्यासाठी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अभिनेता सिद्धार्थ जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ‘सकाळ’ माध्यम समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, ‘साम टीव्ही’चे कार्यकारी संपादक प्रसन्न जोशी, ‘साम टीव्ही’चे सरव्यवस्थापक (सेल्स) अमित सिंह, साम टीव्हीच्या प्रतिनिधी प्राची कुलकर्णी आदी या प्रसंगी उपस्थित होते. हा सोहळा सहयोगी प्रायोजक जमीन प्रायव्हेट लिमिटेड आणि विशेष प्रायोजक व्लोकप मीडिया सोल्यूशन यांच्या प्रायोजकत्वाने येथील सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जे. डब्ल्यू. मॅरिएट येथे पार पडला.

या सोहळ्यात गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते अभिजित उत्तम घोरपडे - फाउंडर आणि सीईओ ग्रिनफिल्ड एग्रीकेम प्रा.लि. पुणे, आसमा सय्यद - संस्थापक, जमीन प्रा.लि. नवी मुंबई, अंकिता प्रकाश पारख-एअरलाईन अँड हॉटेल मॅनेजमेंटअकॅडमी (नाशिक), डॉ. अनिल हेरूर - फोर्टीस हॉस्पिटल, मुंबई, डॉ. अमोल सुहास जोग-जोग एज्युकेशनल ट्रस्ट, डॉ. अर्चिस नेर्लीकर - नेर्लीकर हॉस्पिटल, पुणे, भावेश बडवे-7एस सलून मॉल, दीपक दिलीप आव्हाड-फाऊंडर अँड मॅनेजिंग डायरेक्टर, डेरी पॉवर लिमिटेड (नाशिक), डॉ. जैनुलाबेद्दीन हमदुल्ले - जीएचसी हॉस्पिटल, मुंबई, जितेंद्र सिंह - प्रियदर्शनी ग्रुप ऑफ स्कूल, पुणे, किशोर मोरे-इनफायनाईट ग्राफिक्स टेक्नॉलॉजी प्रा.ली, डॉ. के.व्ही.पाठक - गुरू आयुर्वेद हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, पुणे, डॉ. मनीष दीपक परदेशी - हेड स्पोर्ट फिजिओथेरपिस्ट, एमिरेट्स क्रिकेट बोर्ड, महादेव श्रीपती कुरणे - निफस्टार एज्युकेशन सेंटर, कोल्हापूर, नीलेश नरेश पाटील-निल्स एंटरप्राइजेस, प्रवीण सुरेश चौधरी-फाऊंडर डायरेक्टर (व्हीईपीएल अँड स्नेह प्रिकास्ट), प्रशांत झाडे - ए. एस. ऍग्री अँड ॲक्वा एलएलपी, प्रेरणा समशेर वरपुडकर - कै. हरिबाई वरपुडकर ग्रामीण महिला सेवाभावी संस्था, परभणी, डॉ. रंजीत उपाध्याय - विनायक हॉस्पिटल, पालघर, डॉ. संजय शेळके, एक्सलेन्स इन होमिओपॅथिक ट्रीटमेंट इन थायरॉइड डिसीज, सादिक बाबला - आयएमसी - युनानी, बुलडाणा, श्रीयाळ माधवराव ठाकरे - डायरेक्टर, इको तेजस, डॉ. सिद्धेश राजेंद्र त्र्यंबके, रेडिएशन अँड मेडिकल ऑनकॉलॉजिस्ट, सीतारामजी अग्रवाल - चेअरमन, सारा बिल्डर्स अॅन्ड डेव्हलपर्स, पुणे-औरंगाबाद, प्रा. डॉ. सुधाकरराव जाधवर - जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, पुणे, वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमारश्री (वास्तुतज्ज्ञ ज्योतिर्विद पंडित शिवकुमारश्री), डॉ. विराज श्रीकांत भंडारी, भंडारी स्पाइन क्लिनिक, विराज झाला, ऋषिराज ग्रुप, नाशिक, डॉ. योगेश रमाकांत जाधव, दीप्ती सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, डॉ. योगेश वैद्य (डायरेक्टर पिनॅकल हॉस्पिटल) यांना गौरवपत्र आणि सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.

‘सकाळ’ने मोठे नाव कमावले आहे. अतिशय संतुलित आणि प्रबोधनपर अशी भूमिका घेऊन काम करीत असलेलं हे वृत्तपत्र आहे. साम टीव्हीसुद्धा अशाच पद्धतीने चालणारं चॅनेल आहे. सकारात्मक आणि संयमित भूमिका या माध्यमातून साम टीव्हीने देखील आजपर्यंत नाव मिळवलेलं आहे. पुरस्कार मिळाला की त्यातून एक स्फूर्ती मिळते, नवीन काहीतरी करण्याची प्रेरणा मिळते, त्यामुळे सर्वांचे अभिनंदन.

- दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री

साम आणि सकाळ यांनी आजच्या पुरस्काराच्या निमित्ताने पुरस्कारार्थींना समाजात एक वेगळी ओळख दिली आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांत अशी मंडळी समाजोपयोगी कामं करीत असतात; पण त्यांना क्वचितच अशा पद्धतीने सन्मानित केले जाते. प्रत्येक क्षेत्राचा मार्ग हा खडतर असतो, आज तुमचा साम टीव्ही सत्कार करतेय त्यामुळे कदाचित यापुढचा मार्ग अजून खडतर असेल याची काळजी आत्तापासून घ्या. ग्लॅमर, पैसा येत-जात असतो, मात्र एकदा का कमावलेलं नाव गेलं की ते पुन्हा येत नाही. त्यामुळे नाव जपणं गरजेचे असतं.

- आदित्य ठाकरे, पर्यावरणमंत्री

आपलीच माणसं आपल्या माणसांना निवडून जेव्हा असा सत्कार करतात, त्याचा आनंद खूप वेगळा असतो. इथे येणारी, पुरस्कार घेणारी प्रत्येक व्यक्ती माझ्यासाठी द्रोणाचार्यांसारखी आहे. मला अर्जुन होता येईल की नाही माहिती नाही; पण मी एकलव्य होण्याचा नक्की प्रयत्न करीत असतो. तुम्ही सगळ्यांनी मला आत्ता या क्षणी देखील खूप काही शिकवलं आहे. साम आणि सकाळ महाराष्ट्रातल्या हिऱ्यांना वेचतेय आणि जगासमोर, देशासमोर आणत आहे.

- सिद्धार्थ जाधव, अभिनेता

Web Title: Saam Tv Honors Meritorious People In Various Fields

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraawardtv