'जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी आता कोणता नवीन भोंगा लावणार'

सध्या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.
mns raj thackeray
mns raj thackeraySakal
Summary

सध्या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती.

मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलं आहे. मनसेप्रमुख राज ठाकरे यांची भोंग्यांबद्दलची भूमिका, राज्यातील विविध ठिकाणचे दौरे आणि महाआरतीवरून राज्यभर चर्चांना उधाण आलं आहे. सध्या राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. मात्र त्यांचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला असल्यानं आता सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

यासंदर्भात कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत भाजपला टोला लगावला आहे. ते म्हणतात, राज ठाकरे यांच्या या नामुष्कीला भाजपाच जबाबदार आहे. सुरुवातीला हवा भरण्याचे काम भाजपानेच केले. पण आता हिंदूत्व व्होट बँकेत वाटेकरी नको असल्यानेच औरंगाबाद सभेआधीच विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाने काढता पाय घेतला आहे. उत्तर भारतीय मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी जाणीवपूर्वक मनसेची कुचंबणा केली जात असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

mns raj thackeray
पूरस्थिती पहायला गेले अन् पाय भिजतील म्हणून कर्मचाऱ्याच्या पाठीवर बसले

राष्ट्रवादीनेही यासंदर्भात एक ट्विट करत राज ठाकरेंना टोमणा मारला आहे. तूर्तास अयोध्या दौऱ्याचा भोंगा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जनतेच्या प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी नवीन भोंगा कोणता लावावा यावर विचारविनिमय सुरू आहे. सविस्तर बोलूच, असं म्हणत त्यांन राज ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

mns raj thackeray
राज्यातील अनेक भागात मुसळधार, आजही पावसाचे ढग कायम राहणार

दरम्यान, राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातल्या भाजपा नेत्याकडून विरोध होत आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित झाला आहे. राज ठाकरेंनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे. २२ मे रोजी पुण्यात होणाऱ्या सभेत याबद्दल अधिक माहिती देणार असल्याचंही राज यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. यामागचं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी राज ठाकरेंची तब्येत बिघडल्याने हा दौरा स्थगित झाला असल्याच्या शक्यता वर्तवल्या जात आहेत.

फक्त उत्तर प्रदेशच नव्हे तर मुंबई भाजपानेही राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आहे. मुंबई भाजपाचे प्रवक्ते संजय ठाकूर यांनी राज ठाकरेंनी फेरीवाले, टॅक्सीवाले, मजूर आणि सर्व कष्टकरी वर्गाची माफी मागावी, अन्यथा त्यांच्या अयोध्या दौऱ्याला आमचा कडाडून विरोध असेल, असा इशारा दिला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com