''संतांपुढे नतमस्तक झाले तर, त्यात.."; राज ठाकरेंना सावंतांचा टोला

sachin sawant on up sadhu mahant challenge to raj thackeray over ayodhya visit rak94
sachin sawant on up sadhu mahant challenge to raj thackeray over ayodhya visit rak94
Updated on

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरून राजकारण तापताना दिसत आहे, त्यांच्या उत्तर भारतीयांबाबतच्या भूमिकेमूळे त्यांच्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशमधील भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून जोरदार विरोध होत आहे. तसेच उत्तर प्रदेशमधील एका सभेत महंतांनी राज ठाकरे यांना एका आठवड्यात माफी मागा, अन्यथा ‘छटी का दुध याद दिलाएंगे’ असा थेट इशारा दिलाय. यावर कॉंग्रेसचे नेत सचिन सावंत यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे.

संचिन सावंत ट्विट करत म्हणाले आहेत की, कोणाच्याही संविधानाने दिलेल्या अधिकारांवर असंविधानिक पध्दतीने रस्त्यावरचा न्याय वापरुन टांच आणण्याचा प्रयत्न किती चुकीचा असतो, याची जाणीव राज ठाकरे यांना झाली असेल. त्याच संविधानाने राज ठाकरेंना देशात कोठेही जाण्याचा अधिकार दिला आहे. त्याला आता अयोध्येतील संत मंडळी आव्हान देत आहेत, असे सावंत म्हणाले आहेत.

त्यांनी पुढे लिहीले की, देशात संविधान हतबल झाले तर काय होईल हे यातून दिसते. २० कोटी मुसलमानांना धर्माचरण करण्याचा अधिकार संविधानाने दिला. त्यांचे रक्षण जर संविधानाला करु दिले नाही तर तेच संविधान तुमचेही रक्षण करण्यास असमर्थ ठरेल, असा इशारा त्यांनी दिला. राज ठाकरेंनी कायम घोर चुका केल्या, आता संतमंडळींनी त्या करु नयेत, असे सावंत म्हणाले आहेत.

sachin sawant on up sadhu mahant challenge to raj thackeray over ayodhya visit rak94
विलासराव असते तर आघाडीची सत्ता आली असती का ? धीरज देशमुखांनी दिलं उत्तर

संतांना क्रोध शोभा देत नाही..

महंतांनी राज ठाकरे यांना दिलेल्या इशाऱ्यानंतर, भगवान श्रीरामांनी तर कैकेयीलाही क्षमा केले. भाजपाने कितीही भडकवले तरी संतांना क्रोध शोभा देत नाही. संतांपुढे नतमस्तक झाले तर, त्यात कमीपणा नाही, हे नवहिंदूत्ववादी राज ठाकरेंना माहीत नसावे, असा टोला देखील सावंत यांनी लगावला. तसेच, पण माफी न मागता राज ठाकरेंना जायचे असेल तर त्यांच्या रक्षणाची जबाबदारी आदित्यनाथ सरकारची आहे असे सचिन सावंत म्हणाले आहेत.

sachin sawant on up sadhu mahant challenge to raj thackeray over ayodhya visit rak94
भंडारा जिल्हा परिषदेत भाजप-कॉंग्रेसची हातमिळवणी, राष्ट्रवादीला डच्चू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com