
भंडारा जिल्हा परिषदेत भाजप-कॉंग्रेसची हातमिळवणी, राष्ट्रवादीला डच्चू
भंडारा : जिल्हा परिषदेतील सत्ता कोणाकडे जाणार असी उत्सुकता लागलेली असताना, भंडारा जिल्हा परिषदेत मात्र पारंपारिक विरोधक असलेले भाजप आणि कॉंग्रेस हे सत्तास्थापनेसाठी एकत्र आले आहेत.
नुकतेच जाहीर झालेल्या जिल्हा परिषद निवडणूकीचा निकालानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदासाठी भाजप (BJP) आणि कॉंग्रेस (Congress) या दोन पक्षांनी हातमिळवणी करत, राष्ट्रवादी कॉंग्रेसला (NCP) सत्तेपासून दूर ठेवलं आहे. (Bhandara ZP Election)
या निवडणूकीत कोणतीही पक्षाला बहुमत नसल्याने नेमके कोण कोणासोबत जाणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. आता कॉंग्रेस-भाजप हे दोघे एकत्र आले असून जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद कॉंग्रेसकडे तर उपाध्यक्षपद हे भाजपकडे गेलं आहे.
हेही वाचा: विलासराव असते तर, आघाडीला शिवसेनेची गरजच पडली नसती : धीरज देशमुख
अध्यक्षपदी कॉंग्रेसच्या गंगाधर जिभकाटे तर उपाध्यक्षपदी भाजपचे संदीप ताले यांची निवड झाली आहे. सुरूवातीला भाजप आणि राष्ट्रवादी सत्ता स्थापन करतील असे बोलले जात होते. दरम्यान भाजपच्या एका नाराज गटाने कॉंग्रेससोबत हातमिळवणी करत सत्तेत वाटा मिळवला आहे. यामुळे भंडारा जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
हेही वाचा: माझे 'ते' फोटो व्हायरल करणाऱ्या सरनाईकांवर कारवाई कधी; सोमय्यांचा सवाल
Web Title: Bjp Congress Form Alliance In Bhandara Zp Election For President And Vice President Seat
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..