
'...त्यामुळे पाथरवट कवितेतील शोषिताचा त्रागा काय कळणार?', सावंतांचा सवाल
तुम्ही आंबेडकरांनाही सोडलं नाही, म्हणत काँग्रेसचा भाजपवर हल्लाबोल
मागील काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात अनेक मुद्द्यांवरून टोलेबाजी सुरु आहे. नास्तिक असणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढालेत. शरद पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात, अशी बोचरी टीका भाजपाने केली होती. आता त्यांच्या टीकेवर कॉंग्रसेने प्रतित्त्युर दिले आहे. कॉंग्रेस नेते सचिन सावंत यांनी यांसदर्भात एक ट्विट केल आहे. बाबासाहेब आंबेडकरांनाही तुम्ही सोडले नाही, त्यामुळे पाथरवट कवितेतील शोषिताचा त्रागा काय कळणार?, असा टोला भाजपला लगावला आहे. (Sachin Sawant News)
शरद पवारांनी हिंदूं धर्माची बदनामी आणि जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते, अशी बोचरी टीका भाजपाने ट्विटद्वारे केली होती. वयात पवारांनी शोभेल अशी वक्तव्य करावी, असेही त्यांनी सुचवले होती. आता यावर पलटवार करत सावंत म्हणतात, तुम्हाला हिंदूत्व शिकवणारे सावरकर नास्तिक होते बरं! तुमच्या समविचाऱ्यांकडून गांधीहत्या करण्याचे ७ वेळा प्रयत्न झाले. ते अस्पृश्यता निवारण व मंदिर प्रवेश कार्यक्रम हाती घेतल्यानंतर झाले. तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांना सोडले नाही मग पाथरवट कवितेतील शोषिताचा त्रागा तुम्हाला काय कळणार?, असा खोचक सवालही त्यांनी केला आहे.
हेही वाचा: निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा फॉर्म्युला, एका घरात एकच पद
दरम्यान, मागील काही दिवसांपासून राज्यातील राजकीय वातावरण गढूळ झालं आहे. राजकीय वर्तुळात अनेक घटना वेगान घडल्याने चर्चांनाही उधाण आली आहेत. भाजपाने साताऱ्यातील शरद पवारांच्या भाषणावरून टोला लगावला होता. त्यावर कॉंग्रसचे सचिन सावंत यांनी उत्तर दिले होते.
काय म्हणाले होते सचिन सावंत
देवी देवतांना दूषणे संतांनीही दिली.
तुकाराम म्हणाले- माझ्या लेखी देव मेला!
जनाबाई म्हणाल्या-अरे विठ्या विठ्या। मूळ मायेच्या कारट्या!
उभी राहूनी अंगणीं। शिव्या देत दासी जनी!, भक्तीतून ईश्वरनिंदेचाही अधिकार मिळतो हे विठ्ठलाचे तेज काढण्याच्या विचारांच्या तुम्हा मनुवाद्यांना कळणार नाही!, असंही त्यांनी सुनावले होते.

हेही वाचा: प्रकाश आंबेडकरांना आठवलेंची ऑफर, म्हणाले तुमच्या नेतृत्वाखाली काम..
Web Title: Sachin Sawant Reaction On Bjp Statement Sharad Pawar Dont Loose To Babasaheb Ambedkar
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..