Vasant More | वसंत मोरेंची पुण्यात महाआरती, राज ठाकरे उपस्थिती लावणार? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Raj Thackeray News, Vasant More News

राज ठाकरे पुण्यात पोहोचण्याधीच घडामोडी, वसंत मोरे करणार महाआरती

राज्यभरात मनसेने पुकारलेल्या भोंग्यांच्या आंदोलनावरुन वातावरण तापलं आहे. राज ठाकरे यांनी मुंबई, ठाणे आणि औरंगाबादमध्ये केलेल्या भाषणांमध्ये इशारा दिल्याने यात आणखी भर पडली. दरम्यान ठाकरे यांनी पुण्यात महाआरती केली होती. औरंगाबादला जाण्यापूर्वीही ठाकरे यांच्यासाठी १०० ब्राह्मणांनी मंत्रपठणही केलं. या कार्यक्रमांना वसंत मोरे यांची उपस्थिती दिसली नाही. मोरे नाराज असल्याच्या बातम्या कायम चर्चेत राहिल्या. (Vasant More News)

मात्र, मोरेंनी यावर स्पष्टीकरण देणं टाळलं. त्यांच्या फेसबूक पोस्ट मार्फत त्यांनी बाजू मांडण्याचा प्रयत्नही केला. अखेर मोरेंनी आज पुण्यात महाआरतीचं आयोजन केलं आहे. महत्वाचं म्हणजे राज ठाकरे पुन्हा तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आहेत. (Raj Thackeray in Pune)

पुण्यातील पक्षांतर्गत गटबाजी आणि काही पदाधिकाऱ्यांची नाराजी दूर करणार असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यामुळे राज ठाकरे पुण्याच्या दौऱ्यावर असतानाच मोरेंनी आरंभलेल्या महाआरतीकडे सर्वांचं लक्ष्य लागलं आहे.

हेही वाचा: 'आपण चुकीच्या दिशेने आहोत', वसंत मोरेंच्या व्हॉट्सअॅप स्टेटसची चर्चा

मनसेचे माजी शहराध्यक्ष वसंत मोरे कात्रज भागातील हनुमान मंदिरात महाआरती करणार आहेत. यामंदिराबाहेर स्टेजही उभारण्यात आलं आहे. मी तिरुपती बालाजीला असल्याने आरतीचे नियोजन झाले नव्हते. आज शनिवार असल्याने महाआरतीचे नियोजन केल्याची महिती मोरे यांनी दिली आहे.

पोलिसांनी परवानगी दिली असल्याने घराजवळील हनुमान मंदिरात आरती करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. वसंत मोरे यांच्याकडून आयोजित केलेल्या महाआरती ला राज ठाकरे उपस्थिती लावणार का यावर सगळ्यांचं लक्ष्य असणार आहे.

Web Title: Vasant More Will Do Mahaarati With Raj Thackeray In Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Raj ThackerayVasant More
go to top