'गांजा ओढा, तहान लागली की..., आघाडी सरकारचा अजब कारभार'; सदाभाऊंचा हल्लाबोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

politics

महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली.

'गांजा ओढा, तहान लागली की...; आघाडी सरकारचा अजब कारभार'

sakal_logo
By
टीम ई सकाळ

राज्यसरकारने आयात केलेल्या विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटीत कपात केली आहे. एका विरष्ठ अधिकाऱ्याने विदेशी मद्यावरील एक्साइज ड्युटी ५० टक्क्यांनी कमी केले असल्याचे सांगितले आहे. याविषयीच्या अधिसूचना जारी करण्यात आल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान आता या मुद्द्यावरून विरोधकांनी महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. माजीमंत्री सदाभाऊ खोत यांनी सरकारवर खोचक टीका केली आहे.

ते म्हणतात, महाराष्ट्र सरकारने दारू वरची एक्साईज ड्युटी १५० टक्क्यांनी कमी केली. हरबल गांजा वढा आणि तहान लागली की मद्यप्राशन करा, असा या महाविकास आघाडी सरकारचा अजब कारभार आहे. एक्साईज ड्युटी कमी करून आता सरकारने दारू पिण्यासाठी लोकांना प्रोसाहित करण्याचे काम हातात घेतले आहे, असा हल्लाबोल त्यांनी केला आहे.

हेही वाचा: 'अमेरिकेत होतं ते महाराष्ट्रात का नाही? CM यांचा कोणावर विश्वास नाहीये का?

दरम्यान एका अधिकाऱ्याने सांगितल्याप्रमाणे, आयात केलेल्या विदेशी मद्याच्या विक्रीतून महाराष्ट्र सरकारला वर्षाला १०० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. या कपातीमुळे सरकारचा महसूल २५० कोटी रुपयांपर्यंत वाढण्याची अपेक्षा आहे कारण यामुळे एक लाख बाटल्यांवरून २.५ लाख बाटल्यांची विक्री वाढणार आहे.

हेही वाचा: मुख्यमंत्र्यांना डिस्चार्ज नाही; राऊतांनी दिली प्रकृतीची माहिती

loading image
go to top