सदाभाऊ संतापले; गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल राज्यसरकारला सहानुभूती

परीक्षांसाठी सरकारचे नियोजन वारंवार बिघडत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.
सदाभाऊ संतापले; गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल राज्यसरकारला सहानुभूती
Updated on
Summary

परीक्षांसाठी सरकारचे नियोजन वारंवार बिघडत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

राज्यातील आरोग्य विभागातील विविध पदांवर कर्मचाऱ्यांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. या संदर्भातील परीक्षांसाठी सरकारचे नियोजन वारंवार बिघडत असल्याने विद्यार्थ्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. २ पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एकाच शहरात परीक्षा देता येणे शक्य आहे. मात्र तसे नियोजन न करता सकाळचा पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर सोलापुरात ठेवण्यात आला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांची दमछाक सुरु आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये प्रचंड घोळ सुरु असल्याने सरकारच्या या परीक्षे संदर्भातील नियोजनावर विरोधकांकडून टीका होत आहे. शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी सरकारवर टीका केली आहे.

सदाभाऊ संतापले; गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल राज्यसरकारला सहानुभूती
IND vs PAK : रोहितसह पाकच्या या गड्याकडे दांडगा अनुभव!

ते म्हणतात, राज्यसरकारने राज्यात आरोग्य भरती परीक्षेचा बाजार मांडला आहे. सरकारच्या अंधाधूंद नियोजनशून्य कारभारामुळे पुन्हा एकदा सामान्य विद्यार्थ्याचा बळी जात आहे. गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल सहानुभूती दाखवयाला या सरकारला जमतं. यांना फक्त वसुलीच्या काही गोष्टी असतील तर त्या सांगा पेपरसंदर्भात काही नको, असा घणाघात त्यांनी केला आहे.

सदाभाऊ संतापले; गांजा फुकणाऱ्या लोकांबद्दल राज्यसरकारला सहानुभूती
"उत्तर प्रदेशातील अल्पसंख्याकांना लक्ष्य करणे थांबवा", शाहांवर निशाणा

दरम्यान, २ पदांसाठी अर्ज केलेल्या विद्यार्थ्यांना एकाच शहरात परीक्षा देता येणे शक्य आहे. मात्र तसे नियोजन न करता सकाळी एक पेपर कोल्हापुरात तर दुपारचा पेपर थेट सोलापुरात ठेवण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या परीक्षांमध्ये प्रचंड घोळ सुरु असल्याने विद्यार्थ्यांना त्रासाला समोरे जावे लागत आहे. काही पदासाठी परीक्षा फी भरण्यात आली नसताना देखील त्यांना हॉलतिकीट प्राप्त झाले आहे. एक पेपर पुण्यात तर दुसरा पेपर सांगलीत, एक पेपर साताऱ्यात तर दुसरा पेपर नाशिकला, एक पेपर ठाणे तर दुसरा वासिमला असे नियोजन केल्यामुळे परीक्षेला हजर कसे रहावे असा मोठा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर उभा ठाकला आहे. यामुळे अनेकांना एकाच पदासाठी परीक्षा द्यावी लागणार आहे. हे टाळायचे असेल तर तातडीने याबाबत नवीन नियोजन करावे अशी मागणी परीक्षार्थी विद्यार्थ्यांमधून होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com