
नेहरूंनी महात्मा गांधींच्या विचारांचा खून केला, अन् सांगितलं खेडी लुटा; सदाभाऊंचं वादग्रस्त विधान
माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी एक मोठ वक्तव्य केलं आहे. पुण्यातील युवा संसदमध्ये आयडिया ऑफ इंडियाच्या सत्रामध्ये बोलताना ते म्हणाले, "महात्मा गांधी यांचा खून माथेफिरु नथुराम गोडसे यांनी केला ही बाब निषेधार्ह आहे पण महात्मा गांधी यांच्या विचारांचा खून नेहरू यांनी केला हे आपल्याला स्विकारावच लागेल.

महात्मा गांधींनी सांगितलं खेड्यांकडे चला खेड्यांचा विकासकरा आणि नेहरूंनी सांगितलं खेडी लुटा आणि शहरं समृध्द करा" असं मोठं वक्तव्य माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केलं आहे. खोत यांच्या या विधानामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह आहेत आहे.
आपल्या देशामध्ये सध्या इंडिया आणि भारत अशे दोन प्रकारचे देश आहेत. यामध्ये भारत हा कष्टकरी शेतकऱ्यांचा देश आहे. महात्मा गांधी यांनी कायम खेड्यांकडे चला असाच विचार मांडला होता, मात्र पंडित नेहरू यांनी या विचारांचा खून केला.
अमेरिका आणि युरोपच्या विचारांसरणीने प्रभावी झालेल्या नेहरूंनी खेड्यांकडे दुर्लक्ष केले. त्यामुळेच खेडी भकास झाली आणि शेतकरी उद्धवस्त झाला.असं खोत म्हणाले.