हातभट्टी,मोहाच्या फुलांच्या वाईनसाठी सदाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना पत्र म्हणाले... Sadabhau Khot | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sadabhau Khot,Uddhav Thackeray

हातभट्टी,मोहाच्या फुलांच्या वाईनसाठी सदाभाऊंचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: वाईन प्रमाणेच गुळापासून बनवलेल्या हातभट्टीची वाईन व मोहाच्या फुलांची वाईन मॉल व किराणा दुकानामध्ये विक्रीसाठी परवानगी मिळावी यासाठी रयत क्रांती संघटनेचे प्रमुख व आमदार सदाभाऊ खोत (Sadabhau Khot) यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना पत्र पाठवले आहे. राज्य सरकारने सुपरमार्केट (Super Market) आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी दिल्यानंतर द्राक्ष उत्पादकांनी आपल्या घरावर गुढी उभारुन स्वागत केल्याची माहिती सदाभाऊंनी ट्विट करत दिली.

या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, राज्य सरकारच्या या निर्णयाचे महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी स्वागत केले आहे. या निर्णयामुळे द्राक्ष उत्पादकांना सोन्याचे दिवस येणार आहेत. महाविकास आघाडीच्या या निर्णयाचे द्राक्ष उत्पादकांनी आपल्या घरावर गुढी उभारुन स्वागत केले आहे.

हेही वाचा: Global Teacher वादाच्या भोवऱ्यात; सोलापूर ZP मध्ये डिसले गुरुजींचा निषेध

या पत्राद्वारे आपणास एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आणून देत आहे, की आपण वाईन विक्रीचा निर्णय घेतल्यानंतर राज्यातील गुळ उत्पादक शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. गुळ व्यवसाय हा सध्या मोठ्या अडचणीतून जात आहे. अनेक गुऱ्हाळघरे बंद पडलेले आहेत. ही गुऱ्हाळघरे जर नव्याने पूर्वीसारखी चालवायची असतील तर गुळापासून गावठी हातभट्टी वाईन बनवायला परवानगी देण्यात यावी. सदर वाईन ही कमी खर्चात तयार करता येईल. गुळाची वाईन तयार करायचे कारखाने गावागावांमध्ये उभा करता येतील. यातून रोजगार तर वाढेलच पण ऊस उत्पादकांना सोन्याचे दिवस येतील. तसेच आदिवासी शेतकऱ्यांनाही आपणास न्याय द्यावा लागेल. मोहाच्या फुलांची वाईन बनवून त्याच्या विक्रीला परवानगी द्यावी. कारण सध्या आपण शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहात, असे सदाभाऊ खोत यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या पत्रात म्हटले आहे.

छोट्या-मोठ्या मद्यनिर्मिती करणाऱ्या ग्रामीण भागातील पारंपारिक मद्य निर्मात्यांना आर्थिक बळकटी मिळावी, यासाठी द्राक्षाच्या उत्पादकांप्रमाणेच राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनादेखील आपण दिलासा द्यावा, अशी मी आपल्या महाविकास आघाडीकडून सदाभाऊंनी अपेक्षा व्यक्त केली आहे.

Web Title: Sadabhau Khot Supermarket Wine Selling Letter To The Cm Uddhav Thackeray

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..