स्वतंत्र मराठवाड्याच्या मागणीवरून सदावर्ते आक्रमक; म्हणाले खासदार ओमराजे...

Gunratn sadavarte
Gunratn sadavarte

उस्मानाबाद - मागील अनेक दिवसांपासून स्वतंत्र विदर्भाची मागणी होत आहे, त्यापाठोपाठ आता मराठवाडा स्वतंत्र राज्य करण्याची मागणी देखील पुढे येऊ लागली आहे. याच विषयावर वकिल गुणरत्न सदावर्ते यांच्या अध्यक्षतेखाली उस्मानाबाद जिल्ह्यात संवाद परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. याचे पोस्टर राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. आज सदावर्ते यांनी उपस्थितांना संबोधित केलं.

हेही वाचा: मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

Gunratn sadavarte
Koshyari Controversy: मराठी बोलण्याच्या ओघात...अमृता फडणवीसांनी केली राज्यपालांची पाठराखण

यावेळी सदावर्ते म्हणाले की, आम्हाला त्रास देण्यात येतोय. कोणत्याही लढ्याची सुरुवात त्रास देण्यापासूनच होते. मराठा संघटनांकडून होत असलेल्या विरोधावर सदावर्ते यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

सदावर्ते यांनी यावेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांना उद्देशून म्हटलं की, तुम्ही संवैधानिक दृष्ट्या लोकसेवक आहात, याची आठवण करून दिली. सदावर्ते यांच्या स्वतंत्र मराठवाडा करण्याच्या मागणीला संभाजी ब्रिगेडकडून विरोध करण्यात येत आहे. यावेळी विरोध करणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यांना अटकही करण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com