सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात पट्टेरी वाघ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 जून 2018

पुणे : नुकत्याच झालेल्या कॅमेरा ट्रॅपमधील अभ्यासात सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील दोन पट्टेरी नर वाघाची छायचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली आहेत. मे महिन्याच्या 23 व 24 तारखेला प्रकल्पातील दोन भागांमध्ये ही छायाचित्रे टिपण्यात आली. सह्याद्री प्रकल्प व भारतीय वन्यजीव संस्था डेहराडून यांच्या अंतर्गत मागील एक वर्षापासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात वेगवेगळे अभ्यास सुरू आहेत. त्या अभ्यासाचा एक भाग म्हणून टायगर रिकर्वी प्रोग्राम सुरू आहे. 

ग्रीड करून पायी किंवा कॅमेरा लावून अभ्यास केला जातो. म्हणेज, दोन-दोन किमीच्या अंतरावर दहा ते पंधरा दिवस कॅमेरा लावून ठेवला जातो. या काळात त्या परिसरात आलेल्या सर्व वन्यजीवांचे परिक्षण केले जाते. त्यांचा अभ्यास केला जातो. असाच अभ्यास सुरू असताना 23 व 24 मे या दोन दिवशी पट्टेरी वाघांची छायाचित्रे कॅमेऱ्यात कैद झाली. ही अतिशय उल्साहदायक बाब आहे. 

मागील काही वर्षांमध्ये या प्रकल्पाचे चांगल्या प्रकारे संरक्षण केल्यामुळे इथे सांबर, बेखर, गवे आदी प्राण्यांची संख्या वाढली आहे. वाघाला जिवंत राहण्यासाठी याच प्राण्यांची गरज असते. त्यामुळेही दोन पट्टेरी वाघांचे वास्तव्य या भागात आढळून आले. ही दिलासादाय बाब आहे.   

Web Title: Sahyadri forest area found two Tigers