Sahyadri Tiger Reserve
esakal
वेळ पहाटे तीन वाजून २० मिनिटे...पिंजऱ्याचा दरवाजा उघडला गेला अन् डरकाळी फोडत ‘चंदा’ झेपावली. क्षणार्धात ती घनदाट जंगलात निघून गेली. तीन वर्षांची तरुण, तडफदार चंदा वाघीण आज सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील चांदोली जंगलात दाखल झाली. सह्याद्री खोऱ्यात पहिली ‘वनलक्ष्मी’ मिळाली.