कालिदास नाट्यगृहाच्या नियमावलीत सुधारणा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 28 ऑगस्ट 2019

नाशिक, ता. 28- महापालिकेच्या वतीने नव्याने नुतनीकरण करण्यात आलेल्या महाकवी कालिदास कलामंदीर नियमावलीवरून कलावंतांमध्ये असलेल्या नाराजीची दखल घेत आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नियमावलीत सुधारणा करतं वादावर पडदा टाकला आहे. विशेष करून दरांमध्ये सुधाकरणा करण्यात आली असून नाटकाचे प्रयोग रद्द झाल्यास अनामत रक्कमेचा परतावा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्याशिवाय कालीदास कलामंदीर मध्ये पुर्णवेळ व्यवस्थापकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

स्मार्ट सिटी अंतर्गत महाकवी कालिदास कलामंदील व महात्मा फुले कला दालनाचे नुतनीकरण करण्यात आल्यानंतर दरांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ करण्यात आली होती. त्याशिवाय क्‍लिस्ट नियम तयार करण्यात आल्याने कलावंतांमध्ये नाराजी होती. दरांमध्ये भरमसाठ वाढ तर करण्यात आलीचं शिवाय कार्यक्रम रद्द झाल्यास अनामत रक्कम देखील परतं केली जात नव्हती. गेल्या आठवड्यात एका नाटकाचा प्रयोग रद्द झाल्यानंतर कलावंतानी नाराजी व्यक्त केली होती. नाशिकच्या रंगकर्मी व प्रेक्षकांमध्ये पालिकेच्या भुमिकेवर टिका झाली होती. आयुक्त गमे यांनी नाराजीची दखल घेत नियमावलीत सुधारणा केली आहे. आरक्षण रद्द झाल्यानंतर संपूर्ण अनामत रक्कम परत देण्याची तरतूद सुधारीत नियमावलीत करण्यात आली आहे. कालिदास नाट्यगृहातील वेळेत बदल करण्यात आला आहे. त्यात सकाळचे सत्र 9 ते 11, प्रथम सत्र दुपारी साडे बारा ते साडे तीन दुसरे सत्र सायंकाळी 5 ते 8, तिसरे सत्र रात्री 9.30 ते 12.30 असे करण्यात आले आहे. नाट्यगृहातील तांत्रिक बिघाड, नैसर्गिक आपत्तीमुळे प्रयोग रद्द झाल्यास पुढील प्रयोगात भाडे समायोजित केले जाणार आहे. कालिदास कलामंदीर व महात्मा फुले कलादालनात व्यवस्थापकाची जागा रिक्त होती त्या जागेवर सहायक व्यवस्थापकाची कायमस्वरुपी नियुक्ती करण्यात आली आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakaalnews kalidas Rule