'जलयुक्त'च्या वार्तांकनात 'सकाळ', 'ऍग्रोवन'ची बाजी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 एप्रिल 2017

संगीता भापकर, संदीप नवले यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर

संगीता भापकर, संदीप नवले यांना राज्य शासनाचे पुरस्कार जाहीर
मुंबई - राज्यात "जलयुक्‍त शिवार' अभियानाच्या उत्कृष्ट वार्तांकनात "ऍग्रोवन' आणि दै. "सकाळ'ने बाजी मारली आहे. "ऍग्रोवन'चे नगरचे प्रतिनिधी संदीप नवले आणि "सकाळ'च्या बारामतीच्या प्रतिनिधी संगीता भापकर यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्कारांची निवड करण्यासाठी जलसंधारण मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीने या पुरस्कारांची निवड केली आहे.

राज्यात "जलयुक्त शिवार' अभियानात उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल सोलापूर, पुणे आणि नगर या जिल्ह्यांना; तर तालुका स्तरावर पुरंदर, कोरेगाव सातारा, चांदवड आणि गाव पातळीवर मळेगाव, वेळू, कर्जत या गावांना अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे 2015-16चे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

"जलयुक्त शिवार' अभियान प्रभावीपणे राबविले जावे, यासाठी शासनाने 2015-16 पासून या अभियानात उत्कृष्ट योगदान देणाऱ्या जिल्हा, तालुका, गाव, व्यक्ती/वैयक्तिक संस्था, अधिकारी/कर्मचारी, पत्रकार व इलेक्‍ट्रॉनिक मीडियासाठी राज्यस्तरावर महात्मा जोतिबा फुले जलमित्र पुरस्कार, विभागस्तर राजमाता जिजाऊ जलमित्र पुरस्कार, तर जिल्हा स्तरावर पुण्यश्‍लोक अहल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार आज राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

जाहीर पुरस्कार, पुरस्कार विजेते व बक्षिसाची रक्कम -
गावे -

- प्रथम : मळेगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) 25 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- द्वितीय : वेळू (ता. कोरेगाव, जि. सातारा) 15 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- तृतीय : कर्जत (ता. कर्जत नगर) 7.5 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

तालुके -
- प्रथम : पुरंदर (जि. पुणे) 35 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- द्वितीय : कोरेगाव (जि. सातारा) 20 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- तृतीय : चांदवड (जि. नाशिक) 10 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

जिल्हे -
- प्रथम : सोलापूर, 50 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- द्वितीय : पुणे, 30 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- तृतीय : नगर, 15 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

वैयक्तिक पुरस्कार -
- प्रथम : संजय ज्ञानोबा शिंदे (नेकनूर, ता. जि. बीड), 50 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- द्वितीय : सुभाष उत्तमराव नानवटे (रा. दोडकी, ता. जि. वाशीम), 30 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

सामुदायिक/अशासकीय संस्था पुरस्कार -
- प्रथम : संस्कृती संवर्धन मंडळ (सगरोळी, ता. बिलोली, जि. नांदेड), 1.50 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- द्वितीय : आर्ट ऑफ लिव्हिंग सेवाभावी संस्था (जालना), 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

वृत्तपत्र पत्रकार पुरस्कार -
- प्रथम : अविनाश अंकुशराव कदम (दै. पुण्यनगरी, पुणे), 50 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- द्वितीय : संदीप दत्तू नवले (ऍग्रोवन, नगर), 35 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- तृतीय : संगीता हनुमंतराव भापकर (दै. सकाळ, बारामती, जि. पुणे), 25 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

इलेक्‍ट्रॉनिक मीडिया पुरस्कार -
- प्रथम : रवींद्र शिवाजी कांबळे (सांगली), 1 लाख रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र .
- द्वितीय : शशांक रमेश चौरे (अमरावती), 71 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- तृतीय : शशिकांत पाटील (लातूर), 51 हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी -
- वि. सि. वखारे, सहसचिव, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- ना. श्री. कराड, अवर सचिव, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- शंकर जाधव, अवर सचिव, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- सुनील गवळी, सहायक कक्ष अधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

राज्यस्तरावर प्रथम, द्वितीय, तृतीय आलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी -
- पुणे विभाग - सोलापूर जिल्हाधिकारी (प्रथम), स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- पुणे विभाग - पुणे जिल्हाधिकारी (द्वितीय), स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- नाशिक विभाग - नगर जिल्हाधिकारी (तृतीय), स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

विभाग स्तरावर प्रथम आलेल्या जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी -
- कोकण विभाग - ठाणे जिल्हाधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- नाशिक विभाग - नगर जिल्हाधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- पुणे विभाग - सोलापूर जिल्हाधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- औरंगाबाद विभाग - उस्मानाबाद जिल्हाधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- अमरावती विभाग - अमरावती जिल्हाधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.
- नागपूर विभाग - नागपूर जिल्हाधिकारी, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र.

Web Title: sakal agrowon topper in jalyukta coverage