Video : ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेच्या ऑडिशनला तरुणींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

राज्यभरातून सौंदर्यवती स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यातून अतिसुंदर व अतिहुशार तरुणींची निवड होणार आहे. ही स्पर्धा म्हणजे मनाचे व विचारांचे सौंदर्य वाढविणारीच आहे. ‘पू. ना. गाडगीळ अँड सन्स’ हे महिलांचे सौंदर्य खुलविणार व त्यांच्या सौंदर्यात भर घालणारे सोने व हिऱ्यांचे अलंकार घडवितात. त्यामुळे या स्पर्धेत तिसऱ्या वर्षी सक्रिय सहभागी होताना आम्हाला खूपच आनंद होत आहे. 
- अमित मोडक, संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी, पू. ना. गाडगीळ आणि सन्स

पुणे - पांढऱ्या शुभ्र गालिचावर रॅम्प वॉक करत एक-एक सौंदर्यवती येत होती अन्‌ आपली ओळख करून देत होती... गाणं, नृत्य, नाटक, कविता अन्‌ अभिनय सादर करून त्याला बुद्धिमत्तेची जोडही देत होती... सौंदर्य, हुशारी अन्‌ हजरजबाबीपणा पाहून परीक्षकही अवाक्‌ होत होते... हा सौंदर्य अन्‌ टॅलेंटचा खजिना उलगडला गेला तो ‘सकाळ माध्यम समूहा’ने आयोजित केलेल्या ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र २०२०’ स्पर्धेच्या ऑडिशनमध्ये.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यातील तरुणींच्या कलागुणांना संधी देण्यासाठी; तसेच सर्वगुणसंपन्न व्यक्तिमत्त्व घडविण्यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यापूर्वी राज्यात नागपूर, नाशिक, जळगाव, ठाणे, कोल्हापूर, सोलापूर व औरंगाबाद येथे या स्पर्धेच्या ऑडिशन झाल्या आहेत. आज पुण्यातील ऑडिशनला विविध जिल्ह्यांसह क्षेत्रातील तरुणींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामध्ये प्रत्येक तरुणीच्या चेहऱ्यावर आनंद, उत्साह ओसंडून वाहत होता. यामध्ये तीन फेऱ्या घेण्यात आल्या. 

अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक

सुंदर अन्‌ उंचपुऱ्या तरुणी रॅम्प वॉक करत आपल्या स्टाइलमध्ये स्वतःची ओळख करून देत होत्या. त्यानंतरच्या फेरीमध्ये कुणी गाणं, नृत्य, नाटक, कविता, भाषण; तर कुणी अभिनय करून दाखवीत होतं. यामध्येही मोठ्या गमतीजमती होत होत्या. तिसरी फेरी मात्र बुद्धिमत्तेचा कस लावणारी होती. यामध्ये तरुणींचा हजरजबाबीपणा पाहण्यात आला. अनेकींनी परीक्षकांना गमतीशीर उत्तरेही दिली. त्यामुळे कधी हास्यकल्लोळ; तर अचूक उत्तरांसाठी टाळ्यांचा कडकडाट होत होता. 

लोकसभेसाठी उमेदवारी मागितली नव्हती : विश्‍वजीत कदम

या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक ‘पू. ना. गाडगीळ आणि सन्स’ आहेत. सहप्रायोजक ‘रावेतकर ग्रुप व सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट’ आहेत; तसेच हेअर अँड मेकअप पार्टनर लीझ ब्यूटी सेंटर अँड स्पा, फॅशन पार्टनर आयएनआयएफडी पिंपरी-चिंचवड, इथेनिकवेअर पार्टनर हस्तकला सारिज, वेलनेस पार्टनर डॉ. बनसोडेझ आयुर्वेद पंचकर्म रिसर्च सेंटर, बिस्पोक काऊचर पार्टनर फ्रेंच नॉट, ट्रॅव्हल पार्टनर गिरिकंद हॉलिडेज, कोरिओग्राफर अँड टॅलेंट ग्रुमर लोवेल प्रभू, फॅशन फोटोग्राफर जितेश पाटील आणि व्हेनू पार्टनर अमनोरा द फर्न हॉटेल अँड क्‍लब हे आहेत.

‘सकाळ’ने आयोजित केलेली ही स्पर्धा मराठमोळ्या तरुणींच्या कलागुणांना वाव देणारीच आहे. यामध्ये तरुणींच्या सौंदर्यासह गुणवत्ताही दिसून आली; तसेच त्यांना एक हक्काचं व्यासपीठही मिळालं आहे. त्यातून तरुणींना प्रोत्साहन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
- तन्वी किशोर, अभिनेत्री

सौंदर्यात सकारात्मक व्यक्तिमत्त्व आणि संयतपणा असायला हवा. सुंदर व्यक्ती बनविणारे हे संपूर्ण मिश्रण आहे. महाराष्ट्रातील हुशार, आणि सुंदर, गुणवान तरुणी समोर आणण्याचे चांगले काम ‘सकाळ’ कोणतेही व्यक्तिगत आणि आर्थिक हित डोळ्यांसमोर न ठेवता करीत आहे. ‘सकाळ ब्यूटी ऑफ महाराष्ट्र’ या उपक्रमात सहभागी होताना ‘हस्तकला’ला अतिशय आनंद वाटतो, कारण साड्या या आपल्या वारशाचा भाग आहेत आणि आम्हाला हा वारसा सर्वांसमोर आणून त्याचे जतन करावयाचे आहे. 
- करीना शेवानी, हस्तकला सारिज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sakal Beauty of maharashtra 2020 competition