अभिनेत्री मानसी नाईकच्या छे़डछाडप्रकरणी एकाला अटक

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 फेब्रुवारी 2020

पुणे : अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग आणि छेडछाड झाल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध साकीनाका पोलिस चौकीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. राञी हा गुन्हा रांजणगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. रांजणगाव पोलिसांनी तात्काळ अजय कल्याणकर (रा.पुणे) याला अटक करण्यात आली आहे तर इतर दोन आरोपी यांनी न्यायालयात जामीन घेतल्याची प्राथमिक माहिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अभिनेत्री मानसी नाईकचा विनयभंग व त्यांच्या आई-वडीलांना जिवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर याबाबत मानसीने मुंबईत साकीनाका पोलिस स्टेशनला आपली तक्रार दाखल केली. तसेच आरोपी हे शिरुर शहरातील वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित असल्याची माहिती साकीनाका पोलिसांनी दिली. 

मानसी नाईकचा विनयभंग करणारा तो व्यक्ती आहे तरी कोण?​

शिवसेनेच्या जिल्हा युवासेनेचे पदाधिकारी बापूसाहेब शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य म्हणून भाऊ कदम, कुशल बद्रीके, प्राजक्ता हनमघर आदींसह प्रसिध्द अभिनेत्री मानसी नाईक दोन दिवसांपूर्वी रांजणगावमध्ये आले होते. यावेळी इतर कलाकारांचे सादरीकरण होत असतानाच नाईक यांना हा कार्यक्रमाच्या नियोजनात असलेल्या एका दांपत्याने त्यांना अर्वाच्च भाषेत वागणूक दिली. दरम्यान याच वेळी एका २१ वर्षीय युवकाने त्यांच्याशी लगट करण्याचा प्रयत्न करुन त्यांना लज्जा उप्तन्न होईल अशी वर्तणूक करताना नाईक यांनी संताप व्यक्त करताच या दांपत्याने त्या युवकाला तेथून पळवून लावले.

पुण्यात मानसी नाईकचा विनयभंग

हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही तर नाईक यांचे काही व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकीही त्यांना दिली गेली. या शिवाय नाईक यांच्या वयस्कर आई यांना रात्री बाराच्या सुमारास फोन करुन ''तुझ्या मुलीला रस्त्यावर आणून मारुन टाकू'' अशीही धमकी दिल्याची माहिती नाईक यांनी दिली.

पुण्यातील गोल्ड जिमला ग्राहक मंचाचा दणका

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One arrested in case of molesting Marathi actress Mansi Naik