Sakal Drawing Competition : ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा स्थगित; शुल्क परत करणार

सकाळ माध्यम समूहातर्फे, दरवर्षी आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा यंदा काही अपरिहार्य कारणामुळे स्थगित करण्यात येत आहे.
Sakal Drawing Competition 2024
Sakal Drawing Competition 2024sakal

पुणे - सकाळ माध्यम समूहातर्फे, दरवर्षी आयोजित केली जाणारी राज्यव्यापी ‘सकाळ’ चित्रकला स्पर्धा यंदा काही अपरिहार्य कारणामुळे स्थगित करण्यात येत आहे. सहभागी स्पर्धकांना व वाचकांना या स्पर्धेचा पुढील तपशील लवकरच कळविला जाईल.

तसेच ज्यांनी आजपर्यंत ऑनलाइन पद्धतीने, वैयक्तिक व गट नोंदणी केली आहे, त्यांचे प्रवेश शुल्क लवकरच ऑनलाइन पद्धतीने परत केले जाणार आहे. यावर्षी ही स्पर्धा येत्या रविवारी (ता. २१) विविध गटांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने होणार होती.

येत्या सोमवारी (ता. २२) अयोध्या येथे रामजन्मभूमीवर मंदिरात प्रभू श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठेचा भव्य सोहळा होणार आहे. यानिमित्त देशभरात विविध धार्मिक उपक्रमांचे मोठ्या उत्साहात आयोजन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर, वरील स्पर्धा स्थगित करण्यात येत आहे.

ही स्पर्धा स्थगित झाल्यामुळे, सहभागी स्पर्धकांच्या होणाऱ्या गैरसोयीबद्दल संयोजकांकडून दिलगिरी व्यक्त केली आहे. तसेच स्पर्धेची पुढील माहिती लवकरच जाहीर केली जाईल, असेही कळविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com