#स्पर्धापरीक्षा - भारत आणि ब्रिक्स परिषद 

टीम ई सकाळ
शनिवार, 3 जून 2017

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील लेख www.esakal.com वर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी 
http://sakalpublications.com वर पुस्तके उपलब्ध आहेत. 

ब्रिक्स (BRICS) राष्ट्रसमुहाची 8 वी वार्षिक परिषद दि. 12 ते 16 ऑक्‍टोबर 2016 दरम्यान भारताच्या गोवा राज्यातील पणजी येथे पार पडली. या परिषदेसाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन (Vladimir Putin), ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष मायकल तेमेर (Michel Temer) चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग (Xi jinping) आणि दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष जेकब झुमा (Jacob Zuma) हे उपस्थित होते. 

या परिषदेतील महत्त्वाच्या घडामोडी पुढीलप्रमाणे 

  • सर्व सदस्य राष्ट्रांना भेडसावणाऱ्या समान प्रश्‍नांचा समावेश असणारा 'गोवा जाहिरनामा' या परिषदेत स्वीकारण्यात आला. 
  • 'प्रतिसादात्मक, सर्वसमावेशक आणि सामुहिक उपाययोजनांची निर्मिती' असा यावर्षीच्या परिषदेचा विषय होता. 
  • 'आंतरराष्ट्रीय दहशतवादाविषयी व्यापक करार' हा करार संयुक्त राष्ट्र सर्वसाधारण सभेने लवकरात लवकर स्विकारण्याची गरज या परिषदेत अधोरेखित करण्यात आली. 
  • संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेसोबतच संयुक्त राष्ट्र कार्यकारणीमध्ये आवश्‍यक ते बदल करुन विकसनशील राष्ट्रांना अधिक प्रतिनिधित्व देण्यात यावे अशी मागणी या परिषदेत करण्यात आली. 
  • 'शाश्‍वत विकास उद्दिष्ट्ये आराखडा 2030' आणि 'ब्रिक्स व्यापारी, आर्थिक आणि गुंतवणूक सहकार्य 2020' या विषयांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. 
  • या परिषदेदरम्यान 'ब्रिक्स बिमस्टेक परिषद' (BRICS- BIMSTEC Summit) आयोजित करण्यात आली होती. आर्थिक, व्यापारी, दहशतवादविषयक क्षेत्रांमधील सहकार्य वृद्धीसाठी दोन्ही गटांतील सदस्य राष्ट्रांदरम्यान चर्चा झाली. 
  • या परिषदेच्या पार्श्‍वभूमीवर भारत आणि रशिया दरम्यान 16 महत्त्वपूर्ण विषयांवर सामंजस्य करार करण्यात आले. पुढील ब्रिक्स परिषद (9वी) 2017 साली चीनमध्ये आयोजित करण्यात येणार आहे. 

ब्रिक्स (BRICS) समुह

  • ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या जगातील प्रमुख विकसनशील अर्थव्यवस्थांचा हा गट असून 2009 साली या समुहाची स्थापना झाली. 
  • 2011 साली दक्षिण आफ्रिकेचा या गटात समावेश करण्यात आला. 
  • ही सर्व राष्ट्रे विकसनशील राष्ट्रे असून हे पाचही देश जी-20 संघटनेचे सदस्य आहेत. 

या गटातील राष्ट्रांमध्ये एकूण मिळून 3.6 अब्ज लोकसंख्या राहत असून एकूण जागतिक लोकसंख्येतील या समुहाचा वाटा अंदाजे 50 टक्के आहे. तर या समुहाचा जागतिक स्थूल उत्पादनातील वाटा 22% (16.6 हजार अब्ज अमेरिकी डॉलर) एवढा आहे. 
 

 

स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी महत्त्वाच्या विषयांवरील आणखी लेख वाचा -

#स्पर्धापरीक्षा - भारत आणि रशियादरम्यान संरक्षण, ऊर्जा क्षेत्रांत करार

#स्पर्धापरीक्षा - बलुचिस्तान

#स्पर्धापरीक्षा - प्रधानमंत्री पीक विमा योजना

#स्पर्धापरीक्षा - अलिप्ततावादी चळवळीविषयी

#स्पर्धापरीक्षा - रिओ ऑलिंपिक स्पर्धा 2016

#स्पर्धापरीक्षा - गुगल प्रोजेक्ट लून

#स्पर्धापरीक्षा -'स्टॅंड अप इंडिया' योजना

#स्पर्धापरीक्षा - बौद्धिक संपदा हक्क धोरण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: sakal news esakal news competitive exam news series upsc mpsc INDIA BRICS SUMMIT